नवी दिल्ली : दिल्लीला यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील जवळपास 1600 विद्यार्थी गेल्या दीड महिन्यापासून दिल्लीला अडकले होते. या विद्यार्थांसाठी 16 मे रोजी दिल्ली-पुणे स्पेशल ट्रेन सोडली जाणार आहे.


दिल्लीहून यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या ट्रेनसाठी चार स्टॉपची परवानगी देण्यात आली आहे. या ट्रेनसाठी आधी दिल्ली ते भुसावळ अशी परवानगी मिळाली होती. मात्र आता दिल्ली ते पुणे व्हाया भुसावळ अशी ही ट्रेन चालणार आहे. या ट्रेनला भुसावळ, नाशिक, कल्याण आणि पुणे हे चार स्टॉप आता असणार आहेत. दिल्लीतून महाराष्ट्रात येण्यासाठी एकूण 1400 विद्यार्थ्यांच्या प्रवासास परवानगी मिळाली आहे.



राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिल्लीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले होते. या विद्यार्थ्यांसाठी तातडीनं दिल्लीतून मुंबई किंवा पुण्याकडे रेल्वे पाठवावी, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.


संबंधित बातम्या




IRCTC Online Booking | संध्याकाळी सहा वाजेपासून आयआरसीटीसीवर रेल्वेचं ऑनलाईन बुकिंग सुरू