नवी दिल्ली : 'आत्मनिर्भर भारत अभियान' सुरु करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अर्थात सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये केवळ स्वदेश वस्तूंचीच विक्री होणार आहे. नवा नियम 1 जूनपासून लागू होईल. अमित शाह यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. तसंच देशात बनवलेल्या वस्तूंचाच अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं.


गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं की, "सर्व सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये आता फक्त देशात बनलेल्या उत्पादनांचीच विक्री करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने आज घेतला आहे. 1 जून 2020 पासून देशभरातील सर्व सीएपीएफ कॅन्टीनमध्ये हा निर्णय लागू होईल. या निर्णयामुळे जवळपास 10 लाख सीएपीएफ कर्मचाऱ्यांचे 50 लाख नातेवाईक स्वदेशी उत्पादनांचा वापर करतील."





'आत्मनिर्भर भारत अभियान'ची पंतप्रधानांकडून घोषणा, कोरोनाशी लढण्यासाठी 20 लाख कोटींचं पॅकेज


"मी देशातील जनतेने स्वदेशी वस्तूंचाच जास्तीत जास्त वापर करावा आणि इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करण्याचं आवाहन मी करतो. प्रत्येक भारतीयाने जर स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्याचा संकल्प केला तर आगामी पाच वर्षात देशाची लोकशाही स्वावलंबी बनू शकते," असं अमित शाह यांनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.





पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (12 मे) देशाला संबोधताना 'आत्मनिर्भर भारत अभियान'चं आवाहन केलं होतं. यासाठी त्यांनी 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली होती. तसंच देशवासियांना स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचं आवाहनही केलं होतं.


Lockdown 4 'आत्मनिर्भर भारत अभियान'ची पंतप्रधानांकडून घोषणा,कोरोनाशी लढण्यासाठी 20 लाख कोटींचं पॅकेज