नवी दिल्ली : देशात कोरोना बाधितांचा संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत देशात 122 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन हजार 525 नवे रूग्ण आढळून आले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गेल्या 24 तासांत 1931 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एका दिवसांत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील कोरोना बाधितांचा आकडा 74 हजार 281 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 2415 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 24 हजार 385 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजेच, देशाचा रिकव्हरी रेट 32.82 टक्क्यांवर पोहोचला आहे.


कोणत्या राज्यात आतापर्यंत कोरोनाचे किती बळी?


आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक 921, गुजरामध्ये 537, मध्यप्रदेशात 225, पश्चिम बंगालमध्ये 198, राजस्थानमध्ये 117, दिल्लीमध्ये 86, उत्तर प्रदेशात 82, आंध्रप्रदेशमध्ये 46, तामिळनाडूमध्ये 61, तेलंगणामध्ये 32, कर्नाटकात 31, पंजाबमध्ये 32, जम्मू-काश्मीरमध्ये 10, हरियाणात 11, बिहारमध्ये 6, केरळमध्ये 4, झारखंडमध्ये 3, ओडीशामध्ये 3, चंदिगढमध्ये 3, हिमाचल प्रदेशात 2, आसाममध्ये 2 आणि मेघालयमध्ये एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


पाहा व्हिडीओ : गावी परतणाऱ्या मजुरांची दलालांकडून आर्थिक कोंडी; प्रत्येकाकडून 3 ते 4 हजाराची लूट



भारतात आता दररोज एक लाख टेस्ट करण्याची क्षमता


देशातील कोरोना बाधितांचा मृत्यूदर 3.2 टक्के इतका आहे. तर रिकव्हरी रेट 32.82 टक्के इतका आहे. सोमवारपर्यंत 2.37% रुग्ण आयसीयूमध्ये होते, तर 0.41 टक्के व्हेंटिलेटवर आणि 1.82 टक्के ऑक्सिजन सपोर्टवर होते. भारतात सध्या 347 सरकारी लॅब आणि 137 प्रायव्हेट लॅब्स आहेत, जिथे कोरोना तपासण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत एकूण 17,62,840 टेस्ट करण्यात आल्या आहेत. भारतात आता दररोज एक लाख टेस्ट करण्याची क्षमता आहे.


20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा


कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत अभियान' या 20 लाख कोटी रुपयांच्या विषेश पॅकेजची घोषणा केली. भारताच्या सकल आर्थिक उत्पन्नाच्या 10 टक्के एवढं हे पॅकेज आहे. या पॅकेजद्वारे देशातील जनतेला फायदा होणार आहे. या आत्मनिर्भर अभियान भारत पॅकेजमुळे देशाला नवी गती मिळणार आहे. कोरोना भारतात संधी घेऊन आला आहे. जगातलं सर्वात उत्तम टॅलेन्ट भारतात असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.


संबंधित बातम्या : 


पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर पॅकेजवरुन काँग्रेसमध्ये वेगवेगळी मतं, काही नेत्यांचा विरोध तर काहींकडून कौतुक


पंतप्रधान मोदींकडून चौथ्या लॉकडाऊनची घोषणा, नियमांचा तपशील 18 मे पूर्वी जाहीर होणार



'आत्मनिर्भर भारत अभियान'ची पंतप्रधानांकडून घोषणा, कोरोनाशी लढण्यासाठी 20 लाख कोटींचं पॅकेज