नवी दिल्ली : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शिक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे. शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन एज्यूकेशनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे असं म्हणत त्यांनी शिक्षण क्षेत्रातील भरीव उपाय योजनाबद्दल सांगितले. डीटीएचवर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळा चॅनेल तयार करणार आहेत. सध्या असे तीन चॅनल असून यामध्ये आणखी 12 चॅनलची भर पडणार आहे. ज्या विद्यार्थांकडे इंटरनेटच्या सुविधेचा अभाव असेल त्यांच्यासाठी हे फायद्याचं असेल असं त्या म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजच्या संदर्भात आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सलग पाचव्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. या आधीच्या चार पत्रकार परिषदांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, स्थलांतरित मजूर, वीज कंपन्या, स्थावर मालमत्ता, वित्त संस्था, कृषी, कोळसा, खनिज आणि संरक्षण क्षेत्रासंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आज त्यांनी शिक्षणक्षेत्रासाठी ही महत्वाची घोषणा केली.
Nirmala Sitharaman | गरीब, गरजूंच्या खात्यात पैसे ट्रान्सफर : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
त्यांनी सांगितलं की, स्वयंप्रभा डीटीएच चॅनलमध्ये पहिल्यांदा 3 चॅनल होते. यात आता 12 नवीन चॅनल जोडले जाणार आहेत. लाईव्ह इंटरअॅक्टिव्ह चॅनलसाठी काम देखील केलं जात आहे. राज्य सरकारांनी यासाठी चार तासांचं कंटेंट दिलं जावं, जे लाईव्ह चॅनलवर दाखवलं जाऊ शकेल, असं त्या म्हणाल्या. देशातील 100 विद्यापीठांमध्ये 30 मेपर्यंत ऑनलाईन कोर्स सुरु केले जातील, असंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वर्गासाठी नवे 12 चॅनल्स सुरु केले आहेत. ई-पाठशाला अंतर्गत 200 नवी पुस्तकांचा समावेश केला आहे, असं देखील त्यांनी सांगितलं. खाजगी डीटीएच ऑपरेटर्सचीही ऑनलाईन वर्गासाठी मदत घेतली जाईल, असं त्या म्हणाल्या.
चॅनलद्वारे ई-कॉन्टेंटची निर्मितीही होईल. वन क्लास, वन चॅनल या योजनेद्वारे 12 वीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी चॅनेल तयार केले जातील. पॉडकॉस्ट, कम्युनिटी रेडिओ या माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल प्रोग्रामही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच दिव्यांगासाठी विशेष शिक्षा सामग्री तयार करण्यात येईल. देशातील टॉप 100 विद्यापीठांना ऑनलाईन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे, असंही त्या म्हणाल्या.
या आधीच्या पत्रकार परिषदांमध्ये काय म्हणाल्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण
संरक्षण उत्पादन क्षेत्रातील एफडीआय मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्के : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याचं स्वातंत्र्य; केंद्र सरकारकडून कृषीक्षेत्रासाठी 11 मोठ्या घोषणा
रेशन कार्ड नसणाऱ्यांना 5 किलो धान्य मिळणार : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मोठ्या घोषणा; कर्मचाऱ्यांना, उद्योग क्षेत्राला दिलासा
सूक्ष्म व लघु उद्योगांना गँरंटीशिवाय 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार : अर्थमंत्री
शिक्षण क्षेत्रासाठी केंद्राची मोठी घोषणा, 'वन क्लास, वन चॅनल' अंतर्गत प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र चॅनल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 May 2020 01:00 PM (IST)
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, स्थलांतरित मजूर, वीज कंपन्या, स्थावर मालमत्ता, वित्त संस्था, कृषी, कोळसा, खनिज आणि संरक्षण क्षेत्रासंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आज त्यांनी शिक्षणक्षेत्रासाठी ही महत्वाची घोषणा केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -