आंध्र प्रदेश : महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी बोगस आहे, असा गौप्यस्फोट केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी केला आहे. ते आंध्र प्रदेशातील रेनिगुंठा येथे बोलत होते.
आंध्र प्रदेशातील 'फर्ग्युसन सेंटर फॉर हायर लर्निंग'चे उद्घाटन सत्यपाल सिंग यांनी केलं. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हे सेंटर उभारले आहे. यावेळी भाषणात ते बोलत होते.
सत्यपाल सिंग नेमकं काय म्हणाले?
"पीएचडीबद्दल संबंधित व्यक्तीला संपूर्ण माहिती असेल, असे सांगता येत नाही. बोगस पदव्यांच तर सुळसुळाट आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्यांची पीएचडी अशीच बोगस आहे", असा गौप्यस्फोट केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी केला.
सत्यपाल सिंग पुढे म्हणाले, "त्या मंत्र्याने ज्या विद्यापीठातून पीएचडी मिळवली, तिथे मी चौकशी केली. संबंधित विभागप्रमुखांना फोन करुन, या विषयात पीएचडीस मान्यता कशी दिली, हे विचारले. तर ते म्हणाले, वरिष्ठ पातळीवरुन संबंधित विषयाला मान्यता देण्यास, तसेच पदवी देण्यास दबाव असल्याचे विभागप्रमुखांनी सांगितले."
सत्यपाल सिंग यांच्या भाषणानंतर पत्रकारांनी त्यांना ‘त्या’ मंत्र्याचं नाव विचारलं. त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. मात्र ते म्हणाले, “माझं नाव ‘सत्य’पाल आहे, त्यामुळे मी जे बोलतो ते खरंच असतं.”
अनेकांना तर पीएचडी या शब्दाचा लाँग फॉर्मही माहित नाही किंवा संबंधित विषयासंदर्भात नीट माहिती सुद्धा नसते. मात्र तरीही त्यांच्याकडे पदवी आहे, असेही सत्यपाल सिंग यावेळी म्हणाले.
सत्यपाल सिंग यांच्या वक्तव्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बोगस पीएचडी पदवी असणारा ‘तो’ मंत्री कोण, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी बोगस : सत्यपाल सिंग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Mar 2018 09:19 PM (IST)
अनेकांना तर पीएचडी या शब्दाचा लाँग फॉर्मही माहित नाही किंवा संबंधित विषयासंदर्भात नीट माहिती सुद्धा नसते. मात्र तरीही त्यांच्याकडे पदवी आहे, असेही सत्यपाल सिंग यावेळी म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -