पाटणा : भारत आणि नेपाळमध्ये तणाव सुरु असतानाच गोळीबाराची घटना घडली आहे. भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ पोलिसांकडून पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. यामध्ये एक भारतीय तरुण जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल केलं असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं.


ही घटना बिहारमधील किशनगंज जिल्ह्याच्या टेढागाछच्या फतेहपूरजवळ भारत-नेपाळ सीमेवर झाली. शनिवारी (18 जुलै) रात्री नेपाळ पोलिसांनी तीन भारतीय नागरिकांवर बेछूट गोळीबार केला, ज्यात एक तरुण जखमी झाला. या तरुणाला उपचारांसाठी तातडीने टेढागाछमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. परंतु चांगले उपचार मिळावेत यासाठी त्याला रेफरल रुग्णालयात पाठवण्यात आलं.


जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं. या तरुणावर पूर्णियामध्ये उपचार सुरु आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, जखमी तरुण जितेंद्र कुमार सिंह (वय 25 वर्षे) आणि त्याचे दोन मित्र अंकित कुमार सिंह आणि गुलशन कुमार सिंह हे साडेसातच्या सुमारास गायीला शोधण्यासाठी भारत-नेपाळ सीमेवर असलेल्याल माफी टोला आणि मल्लाह टोला इथे गेले होते.





गावाबाहेरच्या शेताच्या दिशेने जात असताना नेपाळ सीमेवर तैनात असलेल्या पोलिसांनी या तरुणांवर गोळीबार केला. यामध्ये जितेंद्र कुमार सिंह या तरुणाला गोळी लागली. नेपाळकडून झालेल्या गोळीबाराच्या घटनेत जखमी तरुण जितेंद्र कुमार सिंहला त्याचे मित्र आणि स्थानिकांनी आरोग्य केंद्रात दाखल केलं. स्थानिक पोलीस आणि बाराव्या बटालियनचे एसएसबी फतेहपूर यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.


याआधी नेपाळकडून गोळीबार
याआधीही नेपाळकडून सीमेवर गोळीबार करण्यात आला होता. मागील महिन्याता म्हणजेच जूनमध्ये नेपाळने गोळीबार केला होका. यामध्ये एकाचा मृत्यू देखील झाला होता, तर चार जण जखमी झाले हेते. या घटने इस घटना को बिहार में भारत-नेपाळ सीमेवर जानकीनगर इथे ही घटना घडली होती.


संबंधित बातम्या


नेपाळच्या पंतप्रधानांचा अजब दावा; खरी अयोध्या नेपाळमध्ये आणि भगवान राम नेपाळी


नेपाळ नकाशा दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; नकाशात भारतातील काही भूभागावर दावा


Nepali Army | भारताच्या सीमेवर नेपाळच्या हालचाली वाढल्या, लिपुलेखा परिसरात हेलिपॅड उभारलं