हैदराबाद : रम्या या हैदराबादच्या 18 वर्षाच्या मुलीवर शेवटी कॅन्सरच्या आजाराने झडप घातली. 30 ऑक्टोबर 2019 रोजी मेक ए विश फाउंडेशनने रचकोंडा पोलिसांना 17 वर्षाच्या कॅन्सरच्या दुर्धर आजाराला तोंड देत वाटचाल करणाऱ्या रम्या नावाच्या मुलीला एक दिवस पोलीस आयुक्त होण्याची इच्छा असल्याचे कळविले होते. तिच्या विनंतीला मान देत रितसर तिला पोलीस आयुक्त खुर्चीवर बसवले होते. आज या मुलीचे निधन झाले. पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.


पत्रकार परिषदेत महिलांच्या प्रश्नासाठी मी प्रयत्न करेन असे तिने प्रामाणिक उत्तर दिले होते. त्यावेळी निजाम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे तिच्यावर उपचार चालू होते आणि ती त्यातून बाहेर आलीही. एका कॉल सेंटरमध्ये ती नोकरी करू लागली. 12वीची परीक्षा पुढच्या वर्षी देण्याचा निर्णय वैद्यकीय सल्यानुसार तिने घेतला. मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने एक मोठा कार्यक्रम घेतला. त्यात राज्याच्या गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी रम्याचा सत्कारही केला. पण काल अखेर तिची कॅन्सरशी चालू असलेली झुंज अपयशी ठरली आणि तिचं निधन झालं.


शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षणासाठी गाईडलाइन्स तयार; विद्यार्थ्यांचे वय, मानसिकता विचारात घेणार


रम्याच्या निधनाची बातमी कळल्यानंतर माझ्या पायाखालची वाळूचं सरकली
पण मे महिन्यात तिची प्रकृती अचानक खालावली. मला मोबाईलवर तिचा मेसेज आला की तिला डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये भरती देण्यास मनाई केली आहे. आणखी फार काही करता येणार नाही, असेही सांगितले. कारण प्लेटलेट्स संख्या 20000 पेक्षा कमी होती. स्थानिक पोलीस आणि डॉक्टराशी बोलून आम्ही तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. इंडियन रेड क्रॉस संस्थेला आम्ही 1000 पेक्षा जास्त रक्तदाते मिळवून दिल्याने त्याच्या मार्फत त्वरित प्लेटलेट्सची व्यवस्था झाली. आर्थिक मदतही आम्ही केली. दर 3 ते 4 दिवसांनी NIMS आणि MNJ निलोफर या हॉस्पिटलमध्ये रम्या प्लेटलेट्साठी जाऊ लागली. पण काल अचानक तिच्या निधनाची बातमी तिच्या मामांनी कळवल्यावर माझ्या पायाखालची वाळू सरकली. हे जिवन किती क्षणभंगुर आहे आणि वैद्यकीय शास्त्र आजही ब्लड कॅन्सर वर मात करू शकले नाही याचा प्रत्यय आला. आमच्या वतीने होईल तेव्हढे प्रयत्न करत 40 दिवस तिच्या मृत्यूला दूर ठेवण्यासाठी आपले हातभार लागले एव्हढेच मात्र समाधान. रम्या तुझ्या जिद्दीला सलाम, अशा भावना आयपीएस महेश भागवत सरांनी व्यक्त केले.


Supreme court | कोरोना बाधितांना दिली जाणारी वागणूक चिंताजनक : सुप्रीम कोर्ट