On this day in history March 20 : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 20 मार्च रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्या दिवशी आणीबाणी हटवण्यात आली होती. त्याशिवाय फिल्मफेअर पुरस्कारची सुरुवात झाली होती. आज जागतिक कविता दिवस आहे. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची स्थापना आजच्याच दिवशी 2006 मध्ये झाली होती. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


जागतिक कविता दिवस World Poetry Day 


कविता म्हणजे कोणासाठी प्रेम, तर कोणासाठी अहंकार... कोणासाठी भाव, तर कोणासाठी विचार...तर कोणासाठी आपला आक्रोश मांडण्याचं उत्तम साधन...  आज जगभरात कविता दिवस साजरा करण्यात येतो. 21 मार्च 199 पासून जागतिक कविता दिवस साजरा करण्यात येतो. 1999 मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोच्या 30 व्या अधिवेशनात 21 मार्च हा दिवस जागतिक कविता दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  आजच्या दिवशी जगभरामधील कवितेचे वाचन, लेखन, प्रकाशन आणि अध्यापन आला प्रोत्साहन दिले जाते


आंतरराष्ट्रीय वन दिवस (International Day of Forests)


तुम्हाला माहितेय का आपली पृथ्वी 33 टक्के जंगलानी व्यापली आहे. जवळपास दोन मिलियनपेक्षा जास्त लोक जंगलावर अवलंबून आहेत. आपल्या आयुष्यात जंगलाचे खूप महत्व आहे. पण विकासाच्या नावाखाली अनेकजण जंगल संपवत आहेत. त्यामुळेच वातावरणात बदल झाला आहे. आपल्याला जलवायू परिवर्तनाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जगभरात दरवर्षी 21 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय वन दिवस (International Day Of Forest 2022) साजरा केला जातो. जंगलाच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 2012 मध्ये यूएन जनरल असेंब्लीने 21 मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिवस म्हणून घोषित केला. हा दिवस लोकांना जंगलांचे महत्त्व आणि जतन करण्याची तसेच जिवंत प्राण्यांच्या जीवनात जंगलांचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी साजरा केला जातो.    


आंतरराष्ट्रीय रंग दिवस International Colour Day


जरवर्षी 21 मार्च हा आंतरराष्ट्रीय रंग दिवस साजरा केला जातो. पोर्तुगीज कलर असोसिएशनने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय रंग दिवस प्रस्तावित केला होता. रंग दिवसासाठी 21 मार्च ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे, ग्रेगरीयन कालगणनेनुसार आजपासून दिवस मोठा होत जातो व 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो. म्हणजे, आज 12 तासांची रात्र आणि 12 तासांचा दिवस आहे.  


जागतिक कटपुतली दिवस World Puppetry Day


21 मार्च रोजी जगभरात कटपुटली दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक कठपुतळी दिवसाची सुरुवात 21 मार्च 2003 रोजी फ्रान्समध्ये झाली.  जगभरात कठपुतलीचा प्रचार आणि कठपुतलींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. प्राचीन लोककला लोकांपर्यंत पोहोचवणे आणि येणार्‍या पिढीला त्याची जाणीव करून देणे हाही या दिवसाचा उद्देश आहे. कठपुतली हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर लोकांना जागरूक करण्याचे माध्यमही आहे. 


International Day for the Elimination of Racial Discrimination 
दरवर्षी 21 मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय जातीय भेदभाव निर्मूलन दिवस साजरा केला जातो. 26 ऑक्टोबर 1966 रोजी UN जनरल असेंब्लीमध्ये याबाबतचा ठराव मंजूर केला होता. तेव्हापासून जगभरात  जातीय भेदभाव निर्मूलन दिवस साजरा करण्यात येतो.  21 मार्च 1960 रोजी दक्षिण आफ्रिकेतील शार्पविले येथे वर्णद्वेषी "कायदे पास करा" विरोधात शांततापूर्ण निदर्शनात पोलिसांनी गोळीबार केला होता, यामध्ये 69 जणांना आपला जीव गमावावा लागला होता. त्यामुळे 21 मार्च हा दिवस  जातीय भेदभाव निर्मूलन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.


डाउन सिंड्रोम दिवस World Down Syndrome Day


डाउन सिंड्रोमबद्दल लोकांच्या मनात जागृत व्हावी, त्यासाठी जगभरात 21 मार्च हा दिवस डाउन्स सिंड्रोम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 2012 पासून या दिवसाची सुरुवात झाली आहे. यंदाच्या डाऊन सिंड्रोम दिवसाची थीम 'विद अस नॉट फॉर अस' अशी आहे.  डाउन सिंड्रोमला वैद्यकीय परिभाषेत ‘ट्रायसोमी 21’ असे म्हणतात. हा आजार जन्मजात किंवा गर्भधारणेच्या काळापासून बालकांमध्ये असतो. 


आणीबाणी उठवली -


21 मार्च भारताच्या इतिहासात महत्वाच्या गोष्टीचा साक्षीदार आहे. कारण आजच्याच दिवशी 1977 मध्ये इंदिरा यांनी आणीबाणी मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. जवळपास दोन वर्ष देशात आणीबाणी लागू होती. 25 जून 1975 रोजी मध्यरात्री तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वातील सरकारच्या शिफारशीनंतर भारतीय संविधानाच्या परिच्छेद 352 अंतर्गत देशात आणीबाणीची घोषणा केली होती. स्वतंत्र भारताच्या इतिहासाती हा सर्वात वादग्रस्त काळ होता. आणीबाणीच्या काळात लोकसभा निवडणूकही स्थगित केली होती. इंदिरा सरकारविरुद्ध संघर्षाचं बिगुल वाजवणारे लोकनायक जयप्रकाश नारायण आणि मोरारजी देसाई यांसारखे नेते, तसंच सरकारची टीका करणारे पत्रकार, समाजसेवक, विविध संघटनांचे लोक आणि विद्यार्थी यांची रवानगी तुरुंगात केली होती. 


फिल्मफेअर पुरस्कारची सुरुवात -


हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित अशा फिल्मफेअर पुरस्काराची सुरुवात आजच्याच दिवशी झाली होती. 21 मार्च 1954 रोजी फिल्मफेअर पुरस्काराची सुरुवात झाली होती. पहिल्या पुरस्कार सोहळ्यात पाच श्रेणीमध्ये पुरस्कार ठेवण्यात आले होते. यामध्ये ‘दो बीघा जमीन’या चित्रपटाने सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार जिंकला होता. 


आजच्याच दिवशी म्हणजे 21 मार्च 1680 रोजी छत्रपती शिवरायांनी 'कुलाबा उर्फ अलिबाग' च्या किल्ल्याची बांधणी सुरू केली होती.  


जपानमध्ये भूकंप , एक लाख जणांचा मृत्यू -
जपानची राजधानी टोक्योमध्ये 1857 मध्ये विध्वंसक भूकंप आला होता. या भूकंपामध्ये जवळपास एक लाख जणांना आपला जीव गमावावा लागला होता. जगातील सर्वात मोठ्या भूकंपामध्ये याची नोंद होते. या भूकंपामध्ये अनेक कुटुंब रस्त्यावर आली होती. या भूकंपातून सावरण्यासाठी जपानला अनेक वर्ष लागली होती. 
 
1791 - टिपू सुल्तानटा पराभव करत इंग्रजांनी बेंगलोरवर कब्जा केला. 


 1413: हेनरी पंचम याला इंग्लंडचा राज म्हणून नियुक्त केले. 
  
 1836 : कोलकातामध्ये पहिल्या सार्वजनिक पुस्तकालयाची सुरुवात झाली. याचे नाव नॅशनल लायब्रेरी असे ठेवण्यात आली. 


  1916 : सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा जन्म झाला होता. त्यांचा जन्म डुमराव बिहार बिहार मध्ये झाला.


1978 राणी मुखर्जीचा जन्म 


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता. 1997 मध्ये राजा की आयेगी बरात ह्या चित्रपटामधून राणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1998 साली आलेला आमिर खानसोबतचा गुलाम हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्यानंतर राणीने काही वर्ष बॉलिवूडवर राज्य केले. राणी मुखर्जीने सात वेळा फिल्मफेअर पुरस्कारांवर नाव कोरलेय. 


ट्विटरची स्थापना twitter - 


सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची स्थापना आजच्याच दिवशी 2006 मध्ये झाली होती. जॅक डोर्सी, नोहा ग्लास, बिझ स्टोन आणि इव्हान विल्यम्स यांनी ट्विटरची स्थापना केली होती. सध्या ट्वीटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे आहे. ट्विटर हे फेसबुक प्रमाणेच एक सोशल नेटवर्किंग वेबसाइट आहे. Twitter च्या माध्यमातून आपण जगभरात काय चालले आहे, किंवा एखाद्या व्यक्तीच्या खाजगी जीवनात काय चालले आहे, याची माहिती घेऊ शकता.