On this day in history july 5th : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 5 जुलै रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्या दिवशी 1913 मध्ये बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली होती, 1975 मध्ये आजच्याच दिवशी देवी रोग भारतातून समूळ नष्ट झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले होते. त्याशिवाय पाकिस्तानचे झुल्फिकार अली भुत्तो यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
देवी रोग भारतातून समूळ नष्ट
देवी या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 5 जुलै 1975 रोजी जाहीर केले. देवी हा रोग करोना महामारीपेक्षाही भयावह होता. देवी रोगामुळे कित्येक लोकांचा बळी गेला आहे. देवी या रोगामुळे गावेच्या गावे ओस पडली होती, यावेळी असंख्य लोक विद्रूप झाल्याची, अनेकांना अंधत्व आल्याची पुष्कळ उदाहरणे आहेत. माणसांच्या अंगावर फोड, पुरळ येत असे. माणूस शिंकताना, खोकताना बाहेर पडणाऱ्या दवपदार्थामुळे हा आजार सगळीकडे पसरायचा. कालंतराने देवीची लस निघाली आणि देवीने भूतलावरून काढता पाय घेतला.
बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली
संगीत रंगभूमीवरील नटसम्राट बालगंधर्व आणि नटश्रेष्ठ गणपतराव बोडस यांनी 5 जुलै 1913 रोजी पुण्यामध्ये गंधर्व नाटक मंडळी या कंपनीची स्थापना केली. उत्तम संगीत आणि नाटक यासह अभिजात कलाकृती रंगमंचावरुन गंधर्व नाटक मंडळी सादर करत असते. किर्लोस्कर नाटक मंडळी या संस्थेतूनच गंधर्व नाटक मंडळीच्या स्थापनेचे बीज सामावले आहे. 1921 मध्ये कर्जात अडकलेल्या या नव्या कंपनीचे बालगंधर्व हे एकमेव मालक होते. त्यानंतर त्यांच्या नाटकांनी मिळवलेल्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यापुढच्या सात वर्षांत कंपनीने सर्व देणी फेडली.
रामविलास पासवान यांची जंयती
लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष रामविलास पासवान यांचं आजच्याच दिवशी 5 जुलै 1954 रोजी जन्म झाला होता. लोकसभेत त्यांनी बिहारच्या हाजीपूर लोकसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 8ल ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रामविलास पासवन यांनी बिहारमधून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पासवान यांनी बी.ए. आणि त्यानंतर एल.एल.बी.पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पोलीस सेवेत नोकरी मिळाल्यानंतर ती न स्वीकारता त्यांनी राजकीय मार्ग स्वीकारला. विश्वनाथ प्रताप सिंह, एचडी देवगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह आणि आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महत्त्वाची मंत्रिपदं भूषवली. पहिल्यांदा ते 1969 मध्ये ते बिहार विधानसभेवर निवडून आले. राम विलास पासवान यांनी 32 वर्षात 11 निवडणुका लढल्या आणि त्यापैकी 9 जिंकल्या. देशाच्या सहा पतप्रधानांसोबत काम करण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावे आहे. 1989 मध्ये ते पहिल्यांदा व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर एच. डी. देवेगौडा यांच्या मंत्रिमंडळातही ते होते. गुजराल सरकारमध्ये त्यांनी रेल्वेमंत्री पदाचा कारभार पाहिला. संयुक्त समाजवादी पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली आणि 1969 मध्ये ते पहिल्यांदा बिहार विधानसभेवर निवडून गेले. 1977 मध्ये हाजीपूर मतदारसंघातील जनता पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. त्यानंतर ते 1980, 1989, 1996, 1998, 1999, 2004 आणि 2014 मध्ये खासदार राहिले. त्यानंतर 2000 साली त्यांनी लोक जनशक्ती पार्टीची स्थापना केली. त्यानंतर 2004 मध्ये ते सत्तेत असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये सामील झाले आणि रसायन व खते मंत्रालय आणि पोलाद मंत्रालयामध्ये केंद्रीय मंत्री राहिले.
झुल्फिकार अली भुत्तो तुरुंगात -
1977 मध्ये जनरल झिया-उल्-हक यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव झाला होता. 25 जुलै रोजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना तुरुंगात टाकले होते. झुल्फिकार अली भुत्तो यांनी 1973 ते 77 या काळात पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे.
सिंधूचा जन्म -
भारताची बॅडमिंटनपटू पुसरला वेंकट सिंधू उर्फ पी. व्ही. सिंधू हिचा आज जन्मदिवस... 5 जुलै 1995 रोजी हैदराबादमध्ये सिंधूचा जन्म झाला होता. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. सिंधूने 2016 चायना ओपन स्पर्धांमध्ये पहिली सुपरसीरिज जिंकली आणि त्यानंतर 2017 मध्ये दक्षिण कोरिया आणि भारतात आणखी चार अंतिम सामने जिंकून विजेतेपद पटकावले. त्या व्यतिरिक्त तिने 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई स्पर्धांमध्ये एक-एक रौप्य पदक मिळवले.
जॉन राइट यांचा जन्म -
भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक जॉन राईट यांचा आज जन्मदिवस.. 5 जुलै 1954 रोजी न्यूझीलंडमध्ये त्यांचा जन्म झाला होता. 2000 ते 2005 या काळात त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. जॉन राइट यांनी न्यूझीलंडकडून 82 कसोटी आणि 149 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
बाळू गुप्ते यांचं निधन -
भारताचे माजी क्रिकेटपटू बाळू गुप्ते यांचं 5 जुलै 2005 रोजी मुंबईत निधन झाले. त्यांनी भारतासाठी 3 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यात त्यांच्यानावावर तीन विकेट आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी दमदार कामगिरी केली होती.
5 July 1962: Algerian Independence
अल्जीरीयाला आजच्याच दिवशी फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले होते. 1830 पासून 1830 पारतंत्र्यात होता.
1997: स्वित्झर्लंडच्या 16 वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.
2009: अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करत रॉजर फेडररने विक्रमी 15 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.
1996 : संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना ’आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर
1913 : किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी ‘गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना केली.
सन 1913 साली महाराष्ट्रीयन मराठी नाटक मंडळी किर्लोस्कर नाटक मंडळाचे प्रमुख नायक गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या सहकार्याने बालगंधर्वांनी ‘गंधर्व नाटक मंडळाची’ स्थापना केली.
1975 : देवी या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.
1998 : साली तामिळनाडू राज्यात डॉल्फिन सिटीचे उद्घाटन करण्यात आले.
1918 : साली प्रख्यात भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य तसचं, केरळ राज्याचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरण यांचा जन्मदिन.
1946 : साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यिक विद्वान, कादंबरीकार, नाटककार आणि लेखक असगर वजाहत यांचा जन्मदिन.
1995 : साली पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक बॅडमिंटनपटू पुसरला वेंकट सिंधु उर्फ पी. वी. सिंधु यांचा जन्मदिन.
1957 : साली भारतीय राष्ट्रवादी राजकारणी, महात्मा गांधी यांच्या गांधीवादी चंपारण्य सत्याग्रहाचे सदस्य व आधुनिक बिहार राज्याचे रचनाकार तसचं, बिहार राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री डॉ. अनुग्रह नारायण सिन्हा यांचे निधन.