मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ज्यांच्यापासून प्रेरणा घेतली होती ते रशियन तत्वज्ज्ञ आणि लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा 9 सप्टेंबर हा जन्मदिवस. तसेच आजच्याच दिवशी 1920 साली अलिगड मुस्लिम विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला होता. 9 सप्टेंबर हा दिवस इतिहासात महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या 


जाणून घेऊया इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं, 


1776 : अमेरिकेचे नाव बदलले 


जगातील सर्वात जुना लोकशाही देश अशी ओळख असलेल्या अमेरिकेच्या नावात आजच्याच दिवशी बदल करण्यात आला. 9 सप्टेंबर 1776 या दिवशी अमेरिकेचे जुने नाव युनायटेड कॉलनीज् बदलून यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं ठेवण्यात आलं. 


1791 : अमेरिकेच्या राजधानीचे नाव वॉशिंग्टन डीसी 


अमेरिकेच्या नावात बदल करण्यात आल्यानंतर 9 सप्टेंबर 1791 रोजी अमेरिकेच्या राजधानीचे नाव वॉशिग्टन डीसी असं करण्यात आलं. अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावरुन राजधानीचे नाव ठेवण्यात आलं. 


1828 : लिओ टॉलस्टॉय यांचा जन्मदिन  


रशियन लेखक, तत्वज्ज्ञ आणि समाजसुधारक लिओ टॉलस्टॉय यांचा आज जन्मदिन आहे. वॉर अॅन्ड पीस ही त्यांची कादंबरी सर्वाधिक गाजलेली कादंबरी मानली जाते. ही कादंबरी साहित्यक्षेत्रातली एक सर्वोत्तम कादंबरी आहे. लिओ टॉलस्टॉय हे वास्तववादी लेखक होते. किंगडम ऑफ गॉड इज विथिन या त्यांच्या कादंबरीमधून त्यांनी अहिंसक लढ्याची संकल्पना मांडली. या त्यांच्या संकल्पनेवरुनच महात्मा गांधी आणि मार्टिन ल्यूथर किंग यांनी प्रेरणा घेतली. 


1850 भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्मदिवस


हिंदी कवी आणि प्रसिद्ध नाटककार भारतेंदू हरिश्चंद यांचा आज जन्मदिन आहे. त्यांचा जन्म वाराणासीमध्ये झाला होता. 


1920 अलिगड मुस्लिम विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा 


मुस्लिम समाजामध्ये आधुनिक सुधारणा आणण्यासाठी सर सैय्यद अहमद खान यांनी 1875 साली अलिगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली. आजच्या दिवशीच, सुमारे 1920 रोजी अलिगड मुस्लिम विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला होता. अलिगड मुस्लिम विद्यापीठ हे ब्रिटिश काळात उच्च शिक्षण मिळण्याचं प्रमुख केंद्र होतं. 'लोकांना ते शिकवा जे त्यांना माहिती नाही' 


1965 : चिनने तिबेटला स्वायत्त प्रांत बनवला


चिनने तिबेवर कब्जा केल्यानंतर 8 सप्टेंबर 1965 साली तिबेट हा आपला स्वायत्त प्रदेश असल्याचं चिनने जाहीर केलं. 


1991 : तझाकिस्तान स्वातंत्र्य झाला


सोव्हिएत रशियाचा भाग असलेला तझाकिस्तान आजच्या दिवशी स्वातंत्र्य झाला. शितयुद्धानंतर 1980 च्या दशकात सोव्हिएत रशियामध्ये विघटनाचं वारं वाहू लागलं आणि 1991 सालापर्यंत रशियाचे 15 देशांमध्ये विभाजन झालं. 


2012: व्हर्गिस कुरियन यांचे निधन 


भारतातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक आणि राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचं आज निधन झालं. व्हर्गिस कुरियन यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं होतं.