14 September In History :  जगात सर्वाधिक बोलल्या आणि समजल्या जाणाऱ्या भाषांपैकी हिंदी ही एक भाषा आहे. महात्मा गांधी म्हणाले होते की, हिंदी ही लोकांची भाषा आहे. महात्मा गांधी यांनी हिंदे भाषेला देशाची राष्ट्रभाषा बनवण्याची शिफारसही केली होती. 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. संविधान सभेने देवनागरी लिपीत हिंदीसह इंग्रजी ही अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली. परंतु, 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून घोषित केले. त्यामुळे पहिला हिंदी दिवस 14 सप्टेंबर 1953 रोजी साजरा करण्यात आला. तेथून पुढे दर या दिवशी संपूर्ण भारत भरत हिंदी दिवस साजरा केला जातो. या शिवाय आजच्या दिवशी अंतराळ यान लुना-2 हे चंद्रावर उतरले होते. या अंतराळ यानाने 14 सप्टेंबर 1959 रोजी चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला होता.


1901 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅकेन्झी यांची गोळ्या झाडून हत्या  


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅकेन्झी यांची 14 सप्टेंबर 1901 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 


1917 : रशियाला अधिकृतपणे प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केले 


आजच्या दिवशी रशियाला अधिकृतपणे प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केले. 


1949 : संविधान सभेने हिंदीला भारताच्या अधिकृत भाषेचा दर्जा दिला 


जगात सर्वाधिक बोलल्या आणि समजल्या जाणाऱ्या भाषांपैकी हिंदी ही एक भाषा आहे. महात्मा गांधी म्हणाले होते की, हिंदी ही लोकांची भाषा आहे. महात्मा गांधी यांनी हिंदे भाषेला देशाची राष्ट्रभाषा बनवण्याची शिफारसही केली होती. 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. संविधान सभेने देवनागरी लिपीत हिंदीसह इंग्रजी ही अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली. परंतु, 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून घोषित केले. त्यामुळे पहिला हिंदी दिवस 14 सप्टेंबर 1953 रोजी साजरा करण्यात आला. तेथून पुढे दर या दिवशी संपूर्ण भारत भरत हिंदी दिवस साजरा केला जातो. 


1959 : सोव्हिएत युनियनचे अंतराळयान प्रथमच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले.


चंद्रावर उतरणारे जगातील पहिले अंतराळ यान लुना-2 हे होते. या अंतराळ यानाने 14 सप्टेंबर 1959 रोजी चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला होता. त्याला लुनिक-2 असेही म्हणतात. सोव्हिएत युनियन म्हणजेच रशियाला मोठ्या प्रयत्नांनंतर हे यश मिळाले. सोव्हिएत युनियनच्या लुना प्रकल्पांतर्गत प्रक्षेपित केलेले हे दुसरे अंतराळयान होते. चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचणारी लुना-2 ही पहिली मानवनिर्मित वस्तू असल्याचे मानले जाते. 


1960 : खनिज तेल उत्पादक देशांनी मिळून ओपेकची स्थापना केली.


ओपेकची ही 13 पेट्रोलियम उत्पादक देशांची संघटना आहे. सौदी अरेबिया, अल्जेरिया, इराण, इराक, कुवेत, अंगोला, संयुक्त अरब अमिराती, नायजेरिया, लिबिया आणि व्हेनेझुएला, गॅबॉन, गिनी, काँगो. हे देश औपेकचे सदस्य देश आहेत. 14 सप्टेंबर 1960 रोजी या सर्व देशांनी एकत्र येत ओपेकची स्थापना केली. 



2000 : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अमेरिकन सिनेटच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले 


अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून देशाची जगभर प्रतिष्ठा उंचावली होती. झाल्यानंतर त्यांनी 14 सप्टेंबर 2000 रोजी अमेरिकन सिनेटच्या दोन्ही सभागडहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले होते. 


 
2008 :रशियातील पर्म विमानतळावर एरोफ्लॉट विमान कोसळले. विमानातील सर्व 88 जणांचा मृत्यू झाला.


रशियातील पर्म विमानतळावर 14 सप्टेंबर 2008 रोजी एरोफ्लॉट विमान कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील सर्व 88 जणांचा मृत्यू झाला होता. 


2009 : भारताने श्रीलंकेचा 46 धावांनी पराभव करत तिरंगी मालिकेतील कॉम्पॅक कप जिंकला


14 सप्टेंबर 2009 रोजी भारत आणि श्रीलंकेमध्ये कॉम्पॅक कपसाठी अंतिम लढत झाली. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 46 धावांनी पराभव करत कॉम्पॅक कपवर आपले नाव कोरले होते.  


2009 : भारताच्या लिएंडर पेस आणिचेक गणराज्यच्या लुकास लोही यांनी महेश भूपती आणि मार्क नोल्स या जोडीचा पराभव केला.