Omicron Variant Testing Kit : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. अशातच ओमायक्रॉन व्हेरियंटचं निदान करणाऱ्या किटला आयसीएमआरकडून (ICMR) मंजुरी देण्यात आली आहे. 'ओमीशुअर' (Omisure) किट ओमायक्रॉन व्हेरियंटचं निदान करणार आहे. हे किट टाटा मेडिकलने तयार केलं आहे. ICMR नं याला मंजुरी दिली आहे. 


भारतातील 23 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत 1892 रुग्ण आढळून आले आहेत. ज्यापैकी 766 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक 568 रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर दिल्लीमध्ये 382, केरळात 185, राजस्थानमध्ये 174, गुजरातमध्ये 152 आणि तामिळनाडू 121 रुग्ण आढळून आले आहेत. 


महाराष्ट्राला ओमायक्रॉनचा वाढता विळखा


राज्यातील आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात सोमवारी ओमायक्रॉनचे 68 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी मुंबईमध्ये 40, पुण्यामध्ये 14, नागपूरमध्ये 4, पुणे ग्रामीण आणि पनवेलमध्ये प्रत्येकी 3, कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा या ठिकाणी प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. 


दिल्लीमध्येही गेल्या 15 दिवसांत दिल्लीत ओमायक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या दोन दिवसांत आढळलेल्या रुग्णांमध्ये 84 टक्के ओमायक्रॉनचे रुग्ण असल्याचं निष्पन्न झालं. ओमाक्रॉनचं वाढतं संकट पाहता दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) आज बैठक बोलावली आहे. DDMA ने 29 डिसेंबर रोजी आपल्या शेवटच्या बैठकीत दिल्लीत 'यलो अलर्ट' अंतर्गत लादलेले निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.


ओमायक्रॉनचा संसर्ग कसा रोखणार? 


भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळं दैनंदिन आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच मास्क, लसीकरण, सोशल डिस्टन्सिंग यांसारख्या कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, घ्यायची खबरदारी आणि पावले पूर्वीप्रमाणेच राहतील. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह