Trending News : नासाच्या (Nasa) शास्त्रज्ञांनी पृथ्वीवर (Earth) येणाऱ्या एका धोक्याचा इशारा दिला आहे, ज्यामुळे जगभरात चिंतेच वातावरण पसरलं आहे. नासाने म्हटले आहे की 11 फेब्रुवारी रोजी एक लघुग्रह (Asteroid) पृथ्वीच्या (Earth) अगदी जवळून जाईल आणि जर हा लघुग्रह (Asteroid) पृथ्वीवर आदळला तर मोठा विनाश होऊ शकतो.


आपल्या पृथ्वीला दररोज अवकाशातून पडणाऱ्या अनेक लघुग्रहांना सामोरे जावे लागते, यातील अनेक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जातात, तर अनेक समुद्रात पडतात, परंतु जर एखादा महाकाय लघुग्रह समुद्राऐवजी जमिनीवर पडला. मोठा विध्वंस होण्याची शक्यता आहे. अशा एका धोक्याची माहिती नासा संस्थेने दिली आहे. नासाने म्हटले आहे की, 11 फेब्रुवारी रोजी पृथ्वीच्या जवळून एक विशाल लघुग्रह जाणार आहे. हा लघुग्रह आणि पृथ्वी यांच्यात टक्कर झाल्यास पृथ्वीचा विनाश होण्याची शक्यता आहे.


लघुग्रहाचा आकार किती आहे?
पृथ्वीच्या दिशेने वेगाने सरकणाऱ्या या लघुग्रहाचा आकार एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षाही मोठा असल्याचे नासाने म्हटले आहे. त्याला 138971 (2001 CB21) असे नाव देण्यात आले आहे. या लघुग्रहाची रुंदी 4265 फूट असून नासाने पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणार्‍या लघुग्रहांच्या यादीत याला स्थान दिले आहे. मात्र, पृथ्वीच्या सर्वात जवळून गेल्यानंतरही ते पृथ्वीपासून तीन लाख मैलांवरून जाईल.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha