नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटनं (Omicron Variant) जगाची धाकधुक पुन्हा वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर जगभरातील सर्वच देशांनी उपययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटची पुष्टी झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनंही चिंता व्यक्त केली आहे. आता ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे देशात तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचा इशारा सीएसआयआरच्याअनुराग अग्रवाल यांनी दिला आहे.
CSIR इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स अॅन्ड इंटीग्रेटिव बायोलॉजीची डायरेक्टर अनुराग अग्रवाल म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट आणण्याइतप ओमायक्रॉन धोकादायक आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट शरीरातील इम्युनिटीला धोका पोहचवू शकतो. ही गोष्ट आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाच्या कोणत्याच व्हेरियंटमध्ये दिसली नाही. ज्या नागरिकांची इम्युनिटी चांगली आहे आणि त्यांचे लसीकरण देखील झाले आहे अशा नागरिकांमध्ये हायब्रिड इम्युनिटी पाहायला मिळते. आपल्या देशात अशा नागरिकांची संख्या अधिक आहे.
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन हा व्हेरियंट महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचलाय. कर्नाटत ओमायक्रॉन या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळलेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. आफ्रिकेतून आलेले 66 वर्षीय आणि 46 वर्षीय रुग्ण ओमायक्रॉन व्हेरियंटनं संक्रमित आढळून आलेत. महाराष्ट्राच्या वेशीवर ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्यानं राज्यातही खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरियंटनं बाधित झालेल्या प्रवाशाच्या संपर्कात एकूण 218 जण आले होते. यातल्या पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. पण या पाच जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालीय की नाही याचा अहवाल मात्र प्रलिबंत आहे.
या अगोदर देखील डॉ. अनुराग अग्रवाल यांनी डेल्टा प्लस व्हेरियंटबद्दल भविष्यवाणी केली होती. जेव्हा डेल्टा व्हेरिंएटने चिंता वाढवली होती. तेव्हा डॉ. अनुराग यांनी डेल्टा हा तिसऱ्या लाटेचं कारण नसणार असे भाकित केलं होते.
काय आहेत लक्षणं?
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय संचारी रोग संस्थान (एनआयसीडी) च्या वतीनं सांगण्यात आलं आहे की, ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण एखाद्या व्यक्तीला झाली तर त्या व्यक्तीमध्ये फारशी काही वेगळी लक्षण दिसून येत नाहीत. एनआयसीडीनं दिलेल्या माहितीनुसार, असंही सांगितलं जात आहे की, डेल्टाप्रमाणेच ओमिक्रॉननं बाधित झालेल्या व्यक्ती एसिम्टोमेटिक होत्या. अशातच एनआयसीडीनं असं मानलं जातंय की, ओमिक्रॉननं बाधित व्यक्तीमध्ये फारशी वेगळी लक्षण दिसत नाहीत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :