Omicron Variant in India : देशात कोरोना विषाणूंच्या (Coronavirus) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यासोबतच कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Variant) रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. त्यातच आता कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Variant) नवीन रुग्णांची देखील भर पडत आहे. अहवालानुसार, आतापर्यंत देशभरात 1270 लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे, परंतु त्यापैकी 320 बरे झाले आहेत. तर, ओमायक्रॉन विषाणू देशातील 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला आहे.


ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक 450 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये दिल्लीला दुसरे स्थान मिळाले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीतही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत दिल्लीत ओमायक्रॉनची 320 रुग्ण सापडले आहेत आणि त्यानंतर केरळमध्ये ओमायक्रॉनचे एकूण 109 रुग्ण आढळले आहेत.


याशिवाय गुजरातमध्ये 97, राजस्थानमध्ये 69, तेलंगणामध्ये 62, तामिळनाडूमध्ये 46, कर्नाटकमध्ये 34, आंध्र प्रदेशमध्ये 16 रुग्ण आढळले आहेत. 


देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 1270वर
देशात आतापर्यंत 1270 लोकांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. आतापर्यंत देशातील 23 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. ओमायक्रॉन व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आहेत. यानंतर केरळ तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 450, दिल्लीत 320 आणि केरळमध्ये 109 लोकांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha