EPFO E-nomination : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खातेदारांना वर्ष संपण्याआधीच नवीन वर्षाची भेट दिली आहे. पीएफ खातेदार आता घरातून कधीही आपल्या वारसांचे ई-नॉमिनेशन (E-Nomination) करू शकतात. त्यासाठी आता कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आली नाही. याआधी ही मुदत 31 डिसेंबर ठरवण्यात आली होती.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ई-नॉमिनेशनबाबत म्हटले की, आता 31 डिसेंबर 2021 नंतरही ई-नॉमिनेशन दाखल करता येऊ शकते. मात्र, शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन ईपीएफओने केले आहे. ई-नॉमिनेशनमुले आपल्यावर अवलंबून असलेल्यांना पीएफ, पेन्शन आणि विम्यासारखी सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळतो.
ई-नॉमिनेशन आणि युएएनला आधारसह लिंक करण्याची शेवटची मुदत 31 डिसेंबर होती. मात्र, यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यातच 28 आणि 29 डिसेंबर रोजी काही वेळेसाठी ईपीएफओचे युनिफाइड मेंबर पोर्टलमध्ये (Unified Member Portal) तांत्रिक समस्या उद्भवली होती. त्यामुळे लोकांनी ई-नॉमिनेशन प्रक्रियेसाठीची मुदत वाढवण्याची मागणी केली होती.
असे करा ई-नॉमिनेशन
1: सर्वप्रथम EPFO ची अधिकृत वेबसाइटवर जा
2: आता तुम्हाला UAN क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करावे लागेल.
3: मॅनेज सेक्शनवर जा आणि ई-नॉमिनेशन या लिंकवर क्लिक करा.
4: आता नॉमिनीचे नाव, फोटो आणि इतर तपशील सबमिट करा.
5: एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडण्यासाठी, Add New बटणावर क्लिक करा.
6: तुम्ही Save Family Details वर क्लिक करताच प्रक्रिया पूर्ण होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- ITR Filing : आयटी रिटर्न्स दाखल करण्याचा अखेरचा दिवस; आयकर विभागाकडून अद्याप मुदतवाढ नाही
- एक जानेवारीपासून होणार 'हे' बदल, ATM मधून पैसे काढण्यापासून ते कपडे खरेदी करणे महागणार!
- आता मित्र-नातेवाईकांकडून बिनधास्त उधारी मागा..., Google Pay आणि पेटीएमचं 'Split फीचर'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha