Coronavirus Cases Today in India : देशात पुन्हा एकदा प्राणघातक कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यासोबतच कोरोनाचा सर्वात धोकादायक प्रकार असलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Variant) रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 16 हजार 764 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, 220 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 1,270 रुग्ण सापडले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची सद्यस्थिती काय आहे.


आतापर्यंत 4 लाख 81 हजार 80 मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या 91 हजार 361 झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 81 हजार 80 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल 7585 रुग्ण बरे झाले होते, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 66 हजार 363 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.


आतापर्यंत 144 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 144 कोटींहून अधिक अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 66 लाख 65 हजार 290 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 142 कोटी 54 लाख 16 हजार 714 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.


देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 1270वर
देशात आतापर्यंत 1270 लोकांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. आतापर्यंत देशातील 23 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आहेत. यानंतर केरळ तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 450, दिल्लीत 320 आणि केरळमध्ये 109 लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha