Srinagar Encounter : श्रीनगरमध्ये आज सुरक्षा दलाला मोठे यश आले. हरवान भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.


जम्मू-काश्मीरमधील हरवाना भागात रविवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त समोर आले. त्यात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. मात्र, आतापर्यंत त्या दहशतवाद्याचे नाव किंवा ओळख याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र ओळख पटल्यानंतर ठार झालेला दहशतवादी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याची माहिती मिळाली आहे. 





दोन दिवसांपूर्वीच कुलगाममध्ये केला होता दहशतवाद्यांचा खात्मा


यापूर्वीही जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यातील प्रत्येक हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. 


पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी बुधवारी रात्री कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. पहाटे झालेल्या या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते.


दरम्यान गेल्या आठवड्यात श्रीनगरच्या जीवन भागात सशस्त्र पोलिसांच्या 9 व्या बटालियनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. तर 12 जण जखमी झाले होते. जवान बसमधून जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्वाच्या बातम्या