Election Commission Meeting on Election Rallies : देशात एकीकडे आगामी निवडणुकीची (Election) रणधुमाळी पाहायला मिळतेय तर दुसरीकडे कोरोना संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third Wave of Corona) धोका आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणूक आयोगाची केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक आयोगाने आरोग्य सचिवांकडून देशातील ओमायक्रॉनच्या (Omicron Variant) परिस्थितीचा तपशीलवार अहवाल मागवला आहे. 


कोरोनाच्या ओमायक्रॉन आणि तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून प्रकारची तयारी केली जात आहे, मात्र निवडणुकीचा प्रचार आणि रॅलींमध्ये होणारी गर्दी कोरोनाविरोधातील लढाई कमकुवत करत आहे. अशा परिस्थितीत आज केंद्रीय निवडणूक आयोगाने आरोग्य मंत्रालयासोबत महत्त्वाची बैठक घेतली. बैठकीत ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) आरोग्य मंत्रालयाकडून (Health Minstry) सविस्तर अहवाल मागवला आहे.


जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक होऊ शकते
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या संदर्भात पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे. बैठकीत आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी निवडणूक आयोगाला कोरोना व्हायरस ओमिक्रॉनच्या नवीन प्रकाराशी संबंधित तपशीलवार माहिती दिली आहे. आरोग्य सचिवांच्या वतीने निवडणूक आयोगाला सांगण्यात आले की, देशातील परिस्थिती नियंत्रणात असून जागतिक स्तरावर प्राप्त झालेल्या अहवालानुसार ओमिक्रॉन घातक नाही. पण हा विषाणू वेगाने पसरतो. अशा स्थितीत प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करून खबरदारी घेण्याची गरज आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha