WTI इंडेक्सवर तेलाची किंमत प्रति बॅरल 4.53 टक्क्यांनी वाढून 65.54 डॉलरवर गेली आहे. अशा परिस्थितीत महागड्या कच्च्या तेलाचा परिणाम घरगुती पेट्रोल-डिझेलच्या दरावर पडेल. तज्ज्ञांचे मते सध्या भारत 80 टक्के कच्चे तेल परदेशी बाजारपेठेतून खरेदी करतो. या महागड्या कच्च्या तेलाचा फटका अर्थव्यवस्थेलाही बसेल. विश्विक वित्तीय सेवा कंपनी नोमुराच्या मते कच्च्या तेलाच्या किंमतीत प्रति बॅरल 10 डॉलरची वाढ झाल्याने याचा परिणाम भारताच्या तिजोरीवर होतो.
अमेरिकेने 3 जानेवारी रोजी सुलेमानीची हत्या केली. तेव्हापासून अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाची शक्यता आहे. इराणने इकरमधील अमेरिकेच्या सैन्याच्या तळांना लक्ष्य केले आहे.
नवीन वर्षात सलग सहा दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यानंतर बुधवारी स्थिरता कायम राहिली. मात्र , आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ पाहता आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईपासून दिलासा मिळण्याची कोणतीही आशा नाही. तेल विपणन कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल केला नाही.
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मधील पेट्रोलचे दर अनुक्रमे. 75.74 रूपये, 78.33 रूपये, 81.33 रूपये आणि 78.69 रूपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर चार महानगरांमध्ये डिझेलची किंमतही अनुक्रमे. 68.79 रुपये, 71.15 रुपये आणि 72.94 रुपये प्रति लिटरवर स्थिर राहिली आहे.