Odisha MLA vehicle : ओडिशामधील बीजेडीच्या निलंबित आमदाराची गाडी अचनाक गर्दीमध्ये घुसली. या दुर्घटनेत सात पोलिसांसह 22 जण जखमी झाले आहेत. ओडिशामधील खुर्दा जिल्ह्यात शनिवारी ही घटना घडली आहे.


ओडिशा खुर्द जिल्ह्यातील बीजेडीचे निलंबित आमदार प्रशांत जगदेव यांच्या वाहनामुळे 22 जण जखमी झाले आहेत. यामध्ये सात पोलिसांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत चिल्का येथील आमदार जगदेवही गंभीर जखमी झाले आहेत. ब्लॉक अध्यक्षांच्या निवडणुकीवेळी बीडीओ बानापूर कार्यालयासमोर गर्दी जमली होती. यामध्ये जगदेव यांची गाडी घुसली, यामुळे ही दुर्घटना घडली आहे.


पाहा व्हिडीओ....










अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दुर्घटनेत बानापूर पोलीस स्थानकातील पोलिसही गंभीर जखमी झाले आहेत. सर्वांना उपचारासाठी भुवनेश्वर येथे नेहण्यात आले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या दुर्घटनेत 15 कार्यकर्ता आणि सात पोलीस जखमी झाले आहेत. या प्रकराचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान, खुर्द येथील एसपी लेख चंद्र पाही म्हणाले की, जखमी आमदाराला उपचारासाठी टांगी येथे नेहण्यात आले होते, त्यानंतर भुवनेश्वर येथे त्यांना हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, गेल्यावर्षी पक्षाविरोधी कामामुळे आमदार जगदेव यांना निलंबित करण्यात आले आहे.