Mayawati on Election Result : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP election 2022) मायावतींचा पक्ष बसपाचा (BSP) सुपडा साफ झाला आहे. यूपी निवडणुकीतील दारूण पराभवानंतर मायावतींनी आता मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सकाळी त्यांनी ट्विट करून बहुजन समाज पक्षाचे सर्व प्रवक्ते यापुढे कोणत्याही टीव्ही चर्चेत भाग घेणार नसल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर त्यांनी प्रसारमाध्यमांवर जातीयवादी वृत्तीचा आरोप केला आहे.


बसपाचे सर्व प्रवक्ते यापुढे कोणत्याही टीव्ही चर्चेत भाग घेणार नाही
मायावतींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'यूपी विधानसभा निवडणुकीदरम्यान, मीडियाने जातीय द्वेष  निर्माण करत आंबेडकरवादी बसपा चळवळीला नुकसान पोहोचवण्याचे काम करत आहे. जे कोणापासूनही लपलेले नाही. अशातच पक्षाच्या प्रवक्त्यांनाही नवी जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे पक्षाचे सर्व प्रवक्ते, सुधींद्र भदौरिया, धरमवीर चौधरी, डॉ. एम. एच. खान, फैजान खान आणि सीमा कुशवाह हे यापुढे टीव्हीवरील वादविवादात भाग घेणार नाहीत.


2017 पूर्वी उत्तर प्रदेशात भाजपचा फारसा वाटा नव्हता.


निवडणुकीच्या निकालानंतर मायावती म्हणाल्या होत्या, "यूपी निवडणुकीचा निकाल हा बसपाच्या अपेक्षेच्या विरुद्ध आहे. त्यामुळे आपण निराश होता कामा नये. त्याऐवजी, आपण त्यातून शिकले पाहिजे, आत्मपरीक्षण करून आपल्या पक्षाची चळवळ पुढे नेली पाहिजे. 2017 पूर्वी उत्तर प्रदेशात भाजपचा फारसा वाटा नव्हता. यूपी निवडणुकीचे निकाल हे आमच्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा धडा आहे.” बसपाविरोधातील नकारात्मक मोहिमेने जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला.


बसपाला किती जागा मिळाल्या?
मायावतींचा पक्ष बसपाला यूपीतील 403 विधानसभा जागांपैकी केवळ एक जागा जिंकता आली आहे. तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला 19 जागा मिळाल्या होत्या. यावेळी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला 13 टक्क्यांहून कमी मते मिळाली आहेत.


संबंधित बातम्या :


Maharashtra Budget Session: फडणवीसांनी वाचलेल्या भाषणातील शब्द अन् शब्द जशाच्या तसा; वाचा संपूर्ण भाषण


Sanjay Raut : सरकार दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल, संजय राऊतांचे फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर