नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात बारावी बोर्डाच्या परिक्षबाबत संभ्रम असताना जेईई मेन्स 2021 परीक्षेचा वेळापत्रक आज शिक्षा मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केले. याआधी विद्यार्थ्यांशी संवाद साधून नॅशनल टेस्टिंग एजन्सीने संपूर्ण विचार करून यावर्षी विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी मिळावी यासाठी चार सत्रात जेईई मेन्स 2021 परीक्षा घेतली जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 2021 या चार सत्रामध्ये जेईई मेन्स परीक्षा घेतल्या जाणार आहे. 16 डिसेंबर 2020 ते 16 जानेवारी 2021 दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज या परीक्षेसाठी करता येणार आहे. जेईई मेन्स 2021 परीक्षा पहिल्यांदाच इंग्रजीसोबत मराठीसह 13 मातृभाषेत ही परीक्षा देता येईल
या परीक्षेचा आयोजन करताना पहिला सत्र - फेब्रुवारी महिण्याच्या 23 ते 26 फेब्रुवारी 2021 असणार आहे.त्यानंतर विद्यार्थी मार्च, एप्रिल, मे महिन्यात सुद्धा परीक्षा देऊ शकेल. यामध्ये या परीक्षा 15 ते 18 मार्च, 2021 दरम्यान तर एप्रिल महिन्यात 27 ते 30 एप्रिल 2021 दरम्यान आणि शेवटची संधी मे महिन्यात 24 ते 28 मे 2021 दरम्यान मिळणार आहे. विद्यार्थ्याला एक किंवा जास्तीत जास्त 4 वेळेस जेईई मेन्स परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना चुका सुधारून अधिकाधिक गुण प्राप्त करता येतील. विद्यार्थ्याला चारही वेळेस परीक्षा देणे अनिवार्य नाही. विद्यार्थी सोयीनुसार परीक्षा चारपैकी किती वेळेस व कधी द्याव्यात हे ठरवू शकेल. चार सत्रांपैकी ज्या जेईई मेन्स परीक्षेत अधिक गुण मिळाले आहेत ते गुण ग्राह्य धरले जातील
JEE 2021 Exam Full Details : जेईई मेन 2021 परीक्षांच्या तारखांची घोषणा
ज्या विद्यार्थ्यांच्या बारावी बोर्डाच्या परिक्षा या चार पैकी एका महिन्यात येत असतील तर ते विद्यार्थी सोयीनुसार इतर महिन्यामध्ये जेईई परीक्षा देऊ शकतील. ऑनलाइन शिक्षण सुरू असताना सीबीएसई व इतर राज्यातील बोर्डानी बारावी बोर्डाचा अभ्यासक्रम कमी केला आहे. त्यामुळे पेपर नेमका कोणत्या अभ्यासक्रमवर असेल? पूर्ण अभ्यासक्रम परिक्षेसाठी येणार का? असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारले जात होते. त्यावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विचार करून निर्णय घेतले आहेत. प्रश्नांची काठिण्य पातळी ठेवून परीक्षेत 90 प्रश्न असणार आहेत. त्यातील 75 प्रश्न सोडवावे लागतील. यामध्ये 15 प्रश्न वैकल्पिक असतील या प्रश्नांना निगेटीव्ह मार्किंग नसेल.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या सर्वधिक गुणांच्या आधारे त्याची रँक व मेरिट लिस्टमधील स्थान जाहीर केलं जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी इच्छा व्यक्त केली की, मातृभाषामध्ये सुद्धा इंजिनियरिंगची प्रवेश परीक्षा घेतली जावी. जेणेकरून तळागाळातील विद्यार्थी भाषेचं बंधन न ठेवता परीक्षा देऊ शकेल, त्यानुसार पहिल्यांदाच जेईई मेन्स परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाणार आहे. हिंदी, इंग्रजी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू,उर्दू या भाषेत देता येणार आहे.
JEE Mains | जेईई मेन्स परीक्षार्थींसाठी महत्वाची बातमी; आता चार वेळा होणार JEE मुख्य परीक्षा