JEE Main 2021 : संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE Main) 2021 चे पहिले सत्र 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे, अशी घोषणा राष्ट्रीय चाचणी एजन्सीने (NTA) आज केली. जेईई मेन 2021 साठी नोंदणी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर सुरु झाली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेमध्ये एनटीएने अनेक बदल केले आहेत. कोविड 19 रोगामुळे ज्यांचा अभ्यासक्रम बदलला असेल अशा वेगवेगळ्या राज्य बोर्डाच्या अंतर्गत अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत अनेक बदल करण्यात आले आहेत.


परीक्षेच्या पॅटर्न विषयी महत्वाचे मुद्दे :

  • जेईई मेन 2021 ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू आणि उर्दू या 13 भाषांमध्ये आयोजित केली जाणार आहे. हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेच्या परीक्षा देशभरात घेण्यात येतील, तर इतर प्रादेशिक भाषेचे प्रश्न संबंधित राज्यांमध्ये घेण्यात येतील.

  • जेईई मेन 2021 परीक्षा प्रयत्नांची (attempts) संख्या एनटीएने वाढविली आहे. जेईई मेन फेब्रुवारी 2021 मध्ये घेण्यात येईल, त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे 2021 मध्ये तीन सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. राज्य परीक्षा/केंद्रशासित प्रदेशात वेगवेगळ्या वेळी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये यामुळे व्यत्यय येणार नसल्याचे एनटीएने सांगितले.

  • लॉकडाऊनमुळे अभ्यासक्रम बदलणाऱ्या शाळा, बोर्डांमार्फत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी जेईई मेनची पद्धत यावेळी बदलली आहे. प्रश्नपत्रिकांना पर्याय असणार आहेत. आता दोन विषयांमध्ये विभागलेल्या प्रत्येक विषयात उमेदवारांचे 30 प्रश्न असतील. विभाग अ मध्ये 20 प्रश्न असतील तर विभाग ब मध्ये 10 प्रश्न असतील. विभाग ब मधील 10 प्रश्नांपैकी कोणत्याही पाच प्रश्नांचे उमेदवारांना उत्तर देता येणार आहे.