नवी दिल्ली : देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज सीआरपीएफच्या 80 व्या स्थापना दिनानिमित्तच्या परेडला हजेरी लावली. यावेळी डोभाल यांनी सीआरपीएफ जवानांसोबत संवाद साधला. आम्ही पुलवामा हल्लातील 40 शहीदांना विसरणार नाही, असं म्हणत दहशतवाद्यांना आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना इशारा दिला.


पुलावामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या त्या 40 जवानांना भारत विसलेला नाही आणि विसरणारही नाही. आम्ही याचा सामना करु. याबाबत काय करायचं आहे आणि कधी करायचं आहे, याचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल. भारताविरुद्ध कारवाई करणारे दहशतावादी असो किंवा दहशतावाद्यांना मदत करणारे असो, त्याना सोडलं जाणार आहे, अशा कडक शब्दात अजित डोभाल यांनी भारतावर हल्ला करणाऱ्या इशारा दिला आहे.





देशावर चालून आलेल्या शत्रूचा सामना करण्यासाठी कोणती फोर्स पाठवावी, यावर जेव्हा बैठकांमध्ये विचार केला जातो, त्यावेळी सीआरपीएफचं नाव आघाडीवर असतं. सीआरपीएफवर आमचा पूर्ण विश्वास आहे. हा विश्वास एका क्षणात येत नसतो, त्यामागे अनेक वर्षांची  मेहनत असते, अशा शब्दात डोभाल यांनी सीआरपीएफचं कौतुक केलं.


अजित डोभाल 2014 नंतर दुसऱ्यांदा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाले होते. याआधी अजित डोभाल 2015 मध्ये भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाले होते.