मुंबई : Novavax कंपनीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत कोविड 19 लस उत्पादन करार जाहीर केला आहे. Novavax ने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 2021 मध्ये NVX-CoV2373 चे एक अब्ज डोस तयार करणार आहे.


ऑगस्टमध्ये Novavax ने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करार केला आहे. Novavax ने लस उत्पादक सीरम संस्थेबरोबर एक अब्ज डोस तयार करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. आता विस्तारीत कराराच्या दृष्टीने सीरम इन्स्टिट्यूट या लशीतील अँटिजन घटक तयार करेल.


अमेरिकन कंपनी Novavax लसीची चाचणी मधल्या टप्प्यात आहे. प्राथमिक टप्प्याच्या चाचणीनंतर असे आढळले की त्यात कोरोना व्हायरस विरुद्ध मोठ्या प्रमाणात अँटिबॉडी तयार झाल्या आहेत. त्यामुळे ही लस येत्या काळात कोरोनासाऱख्या साथीवर मात करण्यासाठी महत्त्वाची ठरु शकते.


भारत बायोटेकच्या बहुप्रतीक्षित 'कोवॅक्सीन' लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु


लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी 2024 पर्यंत वाट पाहावी लागणाार- सीरम इन्स्टिट्यूट


जगभरात कोरोनाचं संकट वाढत असताना आता लस कधी येणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. काही कंपन्यांनी असा दावा केला आहे की या वर्षात कोरोनावरील लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. तर काहींनी लस पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होईल असा दावा केला आहे. तर सीरम इन्स्टिट्युटने कोरोनावरील लस 2024 च्या शेवटी सर्वांना उपलब्ध होईल असं म्हटलं आहे.


एम मीडिया इन्स्टिट्यूटशी बोलताना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर्श पूनावाला म्हणाले की, जगभरातील लोकांना तातडीने लस उपलब्ध व्हावी यासाठी फार्मा कंपन्या सहजपणे त्यांचे उत्पादन वाढवू शकत नाहीत. कोविड 19 ची लस प्रत्येकाला मिळण्यासाठी 4 वर्षे लागू शकतात. पूनावाला पूर्वी असेही म्हटले होते की गोवर सारख्या आजारांप्रमाणे कोरोना व्हायरसलाही दोन डोस आवश्यक असतील. अशा परिस्थितीत संपूर्ण जगासाठी 1500 कोटी डोसची व्यवस्था करावी लागेल.





Lockdown Effect on kids | कोरोना, लॉकडाऊनचा लहानग्यांवर परिणाम? मुलांमध्ये चिडचिड, अतिसंताप, भुकेच्या तक्रारी!