Seema Haider : गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदर (Seema Haider) भारत-पाकिस्तानमधील वादविवाद अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. यूपीचे एटीएस सीमा हैदरची चौकशी करत आहे. या दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सीमा हैदरची प्रेमकहाणी खरी आहे की तिने सचिन मीनाला कोणाच्या सांगण्यावरून हनी ट्रॅपमध्ये अडकवले? याचं उत्तर तपास यंत्रणेतून समोर येईल. मात्र, प्रेमात पडलेल्या मुलीची सीमा ओलांडून भारतात येण्याची ही पहिलीच घटना नाही. सीमा हैदरसारखी आणखी काही प्रकरणेही समोर आली आहेत. 


इकरा-मुलायमची प्रेमकहाणी


सीमा हैदरच्या आधी इकरा नावाची मुलगी पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आली होती. तिचा भारतात येण्याचा पॅटर्नही सीमा हैदरसारखाच होता. सीमा हैदरच्या म्हणण्यानुसार, सीना-सचिन पबजी खेळताना सीमा सचिन मीनाच्या प्रेमात पडली होती. तर, पाकिस्तानच्या इकराने ऑनलाईन लुडो खेळताना भारताच्या मुलायम सिंह यादवच्या प्रेमात पडली.  इकरा ही पाकिस्तानच्या दक्षिण सिंध प्रांतातील रहिवासी होती. ती सप्टेंबर 2022 मध्ये अभ्यासासाठी घरातून निघाली होती पण दुबई आणि काठमांडूमार्गे भारतात पोहोचली. सचिनप्रमाणेच मुलायमही इकराला घेण्यासाठी नेपाळला गेला होता. दोघांनी तिथेच लग्न केले. 7 दिवस प्रवास करून सीमा ओलांडून हे दोघे भारतात आले आणि बंगळुरूमध्ये राहू लागले. इकराने येथे तिचे नाव बदलून रवा यादव असे ठेवले होते. अखेर चोरी पकडली गेल्यानंतर इकरा आणि मुलायम यांच्या प्रेमकथेचा शेवट झाला. कथेच्या शेवटी इकराला पाकिस्तानी रेंजर्सकडे सोपविण्यात आलं होतं. मुलायम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो अजूनही तुरुंगात आहे.


सीमा हैदरसारखी सीमा ओलांडून ज्युली बांगलादेशातून आली होती


ज्युलीची प्रेमकथा


ज्युली पाकिस्तानातून नव्हे तर बांगलादेशातून यूपीत आली होती. यूपीच्या मुरादाबादमध्ये राहणाऱ्या अजयच्या फेसबुकच्या माध्यमातून ती प्रेमात पडली. सीमा हैदरप्रमाणे हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर तिने अजयशी लग्न केले. परंतु, काही दिवस राहून यूपीत राहून ज्युली बांगलादेशात परतली तिच्याबरोबर अजयही गेला. पण आता तो तिथेच अडकला आहे. त्याच्या आईचे म्हणणे आहे की ज्युलीने तिच्या मुलाबरोबर काहीतरी वाईट केले आहे. 


सपलाची प्रेमकथा


पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील एका तरुणाचे बांगलादेशातील सपलाशी ऑनलाईन कनेक्शन झाले. सपला या तरुणाच्या इतक्या प्रेमात पडली की तिने आपला देश सोडून भारतात प्रवेश केला. सुमारे अडीच महिन्यांपासून ती तिच्या प्रियकराबरोबर सिलीगुडी येथे राहत होती. एके दिवशी अचानक तिला समजले की तिचा प्रियकर तिला फसवून नेपाळमध्ये विकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ती संधी मिळताच प्रियकराच्या घरातून पळून गेली. मात्र, बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी तिलाअटक केली. सपलाला गेल्या गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून न्यायालयाने तिची कारागृहात रवानगी केली. या प्रकरणी सपलाच्या प्रियकराचा शोध सुरू आहे.  


कृष्णाची प्रेमकथा


पाकिस्तानी सीमा हैदरप्रमाणेच गेल्या वर्षी मे महिन्यात कृष्णा नावाची बांगलादेशी मुलगी तिच्या भारतीय प्रियकरासाठी सीमा ओलांडून भारतात आली होती. तिची फेसबुकवर कोलकाता येथील अभिक मंडलशी मैत्री झाली. ती गुपचूप बांगलादेशातून पळून भारतात आली. येथे तिने तिच्या प्रियकराशी लग्नही केले. आपला जीव धोक्यात घालून ती भारतात आली खरी पण पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यावर या लव्हस्टोरीचा शेवट झाला. 


महत्त्वाच्या बातम्या :


Parliament Monsoon Session: मणिपूर हिंसा, महागाई, UCC आणि महिला आरक्षण; दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीमध्ये 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा