Bharatanatyam Dancer : केवळ हिंदू (Hindu) नाही, म्हणून एका भरतनाट्यम नृत्यांगणेला मंदिरात नृत्य करण्यास मनाई करण्यात आल्याचा प्रकार केरळमध्ये (keral) घडलाय. नृत्य करण्यास मनाई करण्यात आल्याने या नृत्यांगणेने सोशल मीडियावर(Social Media) पोस्ट शेअर करत तिचे दु:ख व्यक्त केले आहे. तसेच तिने मंदिर व्यवस्थापनेवर आरोप केले आहेत. काय घडले नेमके?


भरतनाट्यम नृत्यांगणाची फेसबुक पोस्ट, सोशल मिडियावर खंत


केरळ मधील त्रिशूर जिल्ह्यातील इरिंजलकुडा येथील कूडलमणिक्यम मंदिरात हा प्रकार घडला. हे मंदिर राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या देवस्वोम बोर्डाच्या अंतर्गत आहे. केरळच्या एका हिंदू मंदिरात भरतनाट्यम नृत्यांगणेला ती हिंदू नसल्याचं कारण देत एका कार्यक्रमातून वगळण्यात आल्याचा आरोप भरतनाट्यम नृत्यांगणा मानसिया व्ही. पी. ने फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. मानसियाने काय लिहलंय सोशल मीडिया पोस्टमध्ये?


सर्व गोष्टी धर्माच्या आधारावर ठरवल्या जातात - नृत्यांगणा


फेसबुक पोस्टमध्ये, मानसिया म्हणते की “माझा नृत्याचा कार्यक्रम २१ एप्रिल रोजी मंदिराच्या परिसरात होणार होता. मंदिराच्या एका पदाधिकाऱ्याने मला कळवले की मी हिंदू नसल्यामुळे मी मंदिरात कार्यक्रम करू शकत नाही. तुम्ही चांगले नर्तक आहात की नाही याचा विचार न करता सर्व गोष्टी धर्माच्या आधारावर ठरवल्या जातात. संगीतकार श्याम कल्याणशी लग्न केल्यानंतर मी हिंदू धर्मात धर्मांतर केलं की नाही, असे प्रश्नही मला विचारले जात आहे. आता तरी माझा कोणताही धर्म नाही, त्यामुळे मी कुठे जावं,’’ असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. तसेच ती म्हणते, धर्मावर आधारित कार्यक्रमातून वगळण्यात आल्याचा प्रकार तिच्यासोबत पहिल्यांदाच घडलेला नाही.


असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही, तर....


मानसिया तिच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणते, काही वर्षांपूर्वी तिला गुरुवायूर येथील श्रीकृष्ण मंदिरात हिंदू नसल्याबद्दल मनाई करण्यात आली होती. “कला आणि कलाकार हे धर्म आणि जात यांच्यात गुंफले जातात. हा अनुभव माझ्यासाठी नवीन नाही. आपल्या धर्मनिरपेक्ष केरळमध्ये काहीही बदललेले नाही. मानसिया म्हणते, भरतनाट्यममधील पीएचडी रिसर्च स्कॉलर असलेल्या मानसियाला याआधी मुस्लिम म्हणून जन्माला आलेली आणि लहानाची मोठी झालेली असूनही शास्त्रीय नृत्याची कला सादर केल्याबद्दल इस्लामिक धर्मगुरूंच्या संतापाचा आणि बहिष्काराचा सामना करावा लागला होता. याची आठवण करून देण्यासाठी मी ते इथे फेसबुकवर अनुभव शेअर करत आहे,’’ असंही मानसिया म्हणाली.


महोत्सवात सुमारे 800 कलाकारांचे सादरीकरण


इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार,  कूडलमानिक्यम देवस्वोम मंदिर मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मेनन यांच्याशी संपर्क साधला असता, मंदिराच्या विद्यमान परंपरेनुसार, मंदिराच्या आवारात केवळ हिंदूच पूजा करू शकतात. “हे मंदिर परिसर 12 एकर जागेवर आहे. 10 दिवसांचा हा उत्सव मंदिराच्या परिसरात होणार आहे. या महोत्सवात सुमारे 800 कलाकार विविध कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार कलाकारांना ते हिंदू आहेत की नाही, हे विचारलं जातं. मानसियाने आपला कोणताही धर्म नसल्याचे लेखी दिले होते. त्यामुळे तिला कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात आली. आम्ही मंदिरात सध्याच्या परंपरेनुसार तिला नकार कळवला आहे,” असं सांगत मानसियाने आरोप केलेत.


संबंधित बातम्या


महिलेनं 21 दिवसांत 15 लोकांना डेट केलं अन् प्रेमावर पुस्तक लिहिलं! आता म्हणतेय...


Trending News : असा पकडला चोर; फूड डिलेव्हरी बॉय मारत होता कस्टमरच्या ऑर्डरवर ताव, अन्...


The Kashmir Files बाबत सोशल मीडियावर पोस्ट, तरुणाला नाक घासायला लावून व्हिडीओ व्हायरल केला!