'आम्ही सामाजिक न्यायाची भाषा करत असूनही आमची अडवणूक करण्यात येत आहे. आमच्यावर खोटे खटले भरले जात आहेत, असा आरोप जिग्नेश मेवाणी यांनी केला. प्रशांत भूषणही यावेळी उपस्थित होते.
जिग्नेश मेवाणी यांनी हुंकार रॅली काढणारच असल्याचं ठणकावून सांगितलं. मात्र परवानगी दिली नसतानाही रॅली काढली, तर कारवाई करण्याचा इशारा दिल्ली पोलिसांनी दिला आहे.
सामाजिक न्यायाचा आवाज मजबूत करणं, चंद्रशेखर यांची सुटका, युवकांना शिक्षण-रोजगाराची मागणीसाठी हुंकार रॅलीचं नियोजन करण्यात आल्याचं जिग्नेश मेवाणींनी सांगितलं होतं.
31 डिसेंबरला शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल जिग्नेश मेवाणी आणि ऊमर खालिद यांच्यावर याआधी पुण्यात गुन्हा नोंद आहे.