PM Modi in Kanpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज उत्तर प्रदेशातील कानपूरला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी 11 वाजता आयआयटी (IIT) कानपूरच्या 54 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. तेथील विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. यासह पंतप्रधान मोदी आज दुपारी दीड वाजता कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्ण भागाचे उद्घाटन करतील. यावेळी बिना-पंकी बहुउत्पादन पाईपलाईन प्रकल्पाचे उद्घाटनही करण्यात येईल.


मेट्रो रेल्वे प्रकल्पाची लांबी 32 किमी
कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्ण भागाचे उद्घाटन हे आणखी एक मोठे पाऊल आहे. आयआयटी कानपूर ते मोती झील हा संपूर्ण नऊ किलोमीटरमी लांबीचा मार्ग आहे. पंतप्रधान कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी करतील आणि आयआयटी मेट्रो स्टेशन ते गीता नगरपर्यंत मेट्रोने प्रवास करतील. कानपूरमधील मेट्रो रेल्वे प्रकल्पाची संपूर्ण लांबी 32 किमी आहे आणि या प्रकल्पासाठी 11 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.


पंतप्रधान मोदींच्या हस्ते बिना-पंकी बहुउत्पादन पाईपलाईन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 356 किमी लांबीच्या या प्रकल्पाची क्षमता वार्षिक 3.45 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे. मध्य प्रदेशातील बिना रिफायनरीपासून कानपूरमधील पंकीपर्यंत पसरलेला या प्रकल्पासाठी 1500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. हा प्रकल्प बिना रिफायनरीमधून पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक करण्यास उपयोगी ठरेल.


 





आयआयटी-कानपूरच्या दीक्षांत समारंभालाही करणार संबोधित


पंतप्रधान मोदी आज सकाळी 11 वाजता आयआयटी कानपूरच्या दिक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून लोकांना या संबोधनासाठी सुचवण्यास सांगितले आहे. पंतप्रधानांनी ट्विट केले की, “या महिन्याच्या 28 तारखेला दिक्षांत समारंभाला संबोधित करण्यासाठी आयआयटी कानपूरला भेट देण्यासाठी मी उत्सुक आहे. ही एक उत्कृष्ट संस्था आहे, या संस्थेने विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. मी सर्वांना त्यांच्या सूचना देण्यासाठी आमंत्रित करतो."


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha