Nitin Gadkari On Toll Plaza : नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी टोलबाबत (Toll Plaza) केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सरकार लवकरच टोल रद्द करण्याचा विचार करत आहे. त्याच्या जागी नवी यंत्रणा काम करेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. सध्या ट्विटरवर नितीन गडकरींचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच, नेटकऱ्यांकडूनही गडकरींच्या वक्तव्यावर वेगवेगळ्य प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. 


नवीन टोल वसुली यंत्रणा सेटेलाईटवर आधारित असेल आणि लवकरच सुरू केली जाईल. मात्र, ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी अद्याप कोणतीही मुदत जाहीर झालेली नाही. या प्रणालीअंतर्गत, प्रवासी महामार्गावरून जेवढ्या किलोमीटरचं अंतर पार करुन प्रवास करतील, तेवढ्याच किलोमीटरनुसार टोल आकारला जाईल. हा टोल टॅक्स (Toll Tax) बँक खात्यातून आपोआप कापला जाईल. यामुळे प्रवाशांना उगाच जादा रक्कम भरावी लागणार नाही आणि जेवढा प्रवास केला, तेवढेच पैसे आकारले जातील.


VIDEO केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले? 






जेवढे किलोमीटर प्रवास करणार, तेवढेच पैसे द्यावे लागणार 


नागपुरात एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, "आता आम्ही टोल रद्द करत आहोत आणि उपग्रहावर आधारित टोलवसुली यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. पैसे थेट तुमच्या बँक खात्यातून कापले जातील आणि तुम्ही जेवढ्या किलोमीटरचा प्रवास कराल, तेवढंच शुल्क आकारलं जाईल. त्यानुसार शुल्क आकारलं जाईल. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल. पूर्वी मुंबई ते पुणे प्रवास करण्यासाठी 9 तास लागायचे, आता तोच वेळ 2 तासांवर आला आहे..."


यासोबतच भारतमाला प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, "भारतमाला-1 प्रकल्प हा 34 हजार किलोमीटरचा आणि भारतमाला-2 हा सुमारे 8500 किलोमीटरचा प्रकल्प आहे. 2024 च्या अखेरीस या देशाचं चित्र दिसेल. ते पूर्णपणे बदलेल. राष्ट्रीय महामार्गाचं जाळं अमेरिकेच्या बरोबरीनं बनवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि मला खात्री आहे की, मी त्यात यशस्वी होईन..."


2024 मार्चपर्यंत योजना देशभरात राबवण्याचा मानस 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबरच्या सुरुवातीला सांगितलं होतं की, भारतीय राष्ट्रीय पोळे प्राधिकरण (NHAI) चे मार्च 2024 पर्यंत नवी प्रणाली लागू करण्याचं उद्दिष्ट आहे. त्याच्या मदतीनं टोल प्लाझावर लागणारा वेळ कमी होणार आहे.


FASTag मुंळे Toll वेटिंग टाईम कमी झालाय 


सध्या टोल भरण्यासाठी फास्टॅग प्रणाली आहे. ही एक इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली होती, जी स्वयंचलित टोल प्लाझावर टोल टॅक्स भरते. त्याच्या मदतीनं, टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ सरासरी 47 सेकंदांवर आली आहे, जो पूर्वी सरासरी 714 सेकंद होता.


FASTag म्हणजे काय?


फास्टॅग ही इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे. यात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञान आहे, ज्याच्या मदतीनं ते टोल प्लाझावर स्वयंचलित टोल पेमेंट करतं. हे कार किंवा इतर वाहनाच्या विंड स्क्रीनवर स्थापित केलेलं असतं.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI