Mukhtar Ansari Property : कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) याला तुरुंगात ह्रदयविकाराच झटका आला. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृ्त्यू झालाय. गाझीपूरचा असलेल्या अन्सारी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एका प्रतिष्ठित कुटुंबात जन्मला होता. मात्र, मुख्तारने गुन्हेगारी क्षेत्र गाठलं. अन्सारीवर अनेक गुन्हे नोंद होते. मुख्तार त्याची गँग तुरुंगातूनच चालवत होता. कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय असतानाही त्याच्या गुन्हेगारीने जनता त्रस्त झाली होती. 


संपूर्ण कुटुंब राजकारणात तरिही गुंडगिरीने सर्वांना केले होते हैराण 


मुख्तार अन्सारीला (Mukhtar Ansari) दोन भाऊ होते. यातील एक भाऊ सध्या म्हणजेच अफजल अन्सारी सध्या गाझीपूरचे खासदार आहेत. शिवाय, मुख्तार अन्सारी 5 वेळेस लोकांमधून निवडून आला होता. शिवाय त्याने 3 वेळेस तुरुंगात असूनही निवडणूक जिंकली होती. मुख्तारने 2022 ची विधानसभा निवडणूक लढली नव्हती. त्याने मोठ्या मुलास ही निवडणूक लढण्यास सांगितले. या निवडणुकीत त्याच्या मुलाने मोठा विजय मिळवला होता. दरम्यान, अब्बास अन्सारी देखील सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. या शिवाय, मुख्तारची पत्नी शाहिस्ती परवीन आणि दुसरा मुलगा उमर अन्सारी सध्या फरार आहेत. दुसरा मुलगा आणि पत्नीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. 


मुख्तार अन्सारीची संपत्ती किती?


मुख्तार अन्सारीच्या गँगमधील (Mukhtar Ansari) गुंडांवर आतापर्यंत 155 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. मुख्तार अन्सारीची एकूण संपत्ती 586 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तर 2100 पेक्षा अधिक बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. उत्तरप्रदेशमध्ये योगींचे सरकार आल्यापासून मुख्तारच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली. योगी सरकारकडून वारंवार त्याच्यावर कारवाया करण्यात येत होत्या. गेल्या काही वर्षांत मुख्तारची जवळपास 605 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. 


योगी सरकारकडून मुख्तारवर कारवाई 


एकेकाळी पूर्वेकडील भागात माफिया आणि कुख्यात गँगस्टर मुख्तारचे (Mukhtar Ansari) मोठे वर्चस्व होते. मात्र, गेल्या 18 महिन्यांमध्ये त्याला 8 प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याच्या 292 सहकाऱ्यांवर 160 गुन्हे दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार, त्याच्या 186 सहकाऱ्यांना योगी सरकारने तुरुंगात पाठवले होते. मुख्तारच्या एकूण उद्योगधंद्यांचा विचार केला तर जवळपास 604 कोटींचा कारभार सरकारने उद्ध्वस्त केला होता. मुख्तार अन्सारीचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी सरकारने सातत्याने मोठी पाऊल उचलली होती. मुख्तारची संपत्ती जप्त करण्यासाठी सरकारने 14(1) कलमान्वये कारवाई केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Mukhtar Ansari Died : कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी मृत्यू, तुरुंगात आला होता हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान निधन