मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या  संचालक नीता अंबानी (Nita Ambani) यांची यावर्षीच्या  फॉर्च्युन इंडियाच्या  शक्तिशाली महिलांमध्ये निवड झाली आहे. नीता अंबानी यांनी या यादीत दुसरे स्थान मिळविले आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी यांनी विशेषतः कोरोना काळात मोठी मदत केली. नीता अंबानी यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांसाठी 1000 फ्री बेड जामनगर येथे उपलब्ध केले. हे बेड NSCI, सेव्हन हिल हॉस्पिटल, ट्रायडंट आणि बिकेसी येथे दिलेल्या बेड व्यतिरिक्त आहे.


नीता अंबानी म्हणाल्या,  देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला होता. दररोज लाखोंच्या संख्येने नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार तसेच अनेक खाजगी कंपन्या आणि स्वयंसेवी संस्था कोविड संक्रमित रूग्णांच्या उपचाराशी संबंधित पायाभूत सुविधा सुधारण्यात गुंतल्या होत्या.  रिलायन्स फाऊंडेशननेही याकामी पुढाकार घेत  गुजरातमधील जामनगरमध्ये ऑक्सिजन पुरवठा करणारे 1000 खाटांचे कोविड रुग्णालय उभारले. या रुग्णालयात रूग्णांना मोफत उपचार सुविधा मिळतात. या रुग्णालयात  कोव्हिड रुग्णांना  विनामूल्य सेवा देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात एका आठवड्यात 400 बेड आणि दुसऱ्या टप्प्यात 600 बेड तयार करण्यात आले. या रुग्णालयात मोफत दर्जेदार सेवा देण्यात येतात.


एवढच नाही तर कोरोना काळात रिलायन्स फाउंडेशनने 25 लाख नागरिकांच्या वॅक्सीनेशनचा सर्व खर्च जिओ हेल्थ हबच्या माध्यामतून केला. तसेच 8.5 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना ज्यामुळे रोजंदारीवर काम करणारे कामगार, फ्रंटलाईन वर्कर्स यांना जेवण पुरवले. यामध्ये 19 राज्ये, 100 जिल्ह्यांता समावेशि आहे. तसेच प्राण्यासांठी देखील 20 अॅम्ब्युलन्सची सोय केली.


तसेच रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी  महिलांसाठी तयार करण्यात आलेला डिजिटल प्लॅटफॉर्म 'हरसर्किल'ला आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने लॉन्च केलं. महिलांचं सशक्तीकरण आणि वैश्विक स्तरावर महिलांच्या उन्नतीसाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सहभाग, नेटवर्किंग आणि परस्पर समर्थनासाठी 'हरसर्किल' प्लॅटफॉर्म महिलांना एक सुरक्षित माध्यम ठरेल.


महिलांसाठी जगभरातील डिजिटल गट म्हणून 'हरसर्किल' तयार करण्यात आलं आहे. भारतीय महिलांपासूनच याची सुरुवात होणार आहे. दरम्यान, जगभरातील महिलांच्या भागीदारीचा रस्ता यामुळे खुला होणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असल्यामुळे हे प्रत्येक वयोगटातील आणि आर्थिक सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या महिलांच्या वाढत्या गरजा आणि त्यांच्या आकांक्षा, महत्त्वकांक्षा आणि स्वप्नांना पूर्ण करेल.


नीता अंबानी म्हणाल्या होत्या की, 'आम्ही HerCircle.in मार्फत लाखो महिलांसाठी एक मोठी संधी ठरु शकते. यामध्ये प्रत्येक महिलेचं स्वागत केलं जाईल. चोवीस तास वैश्विक नेटवर्किंग, डिजिटल क्रांती आणि सर्वांच्या मदतीने हरसर्किल महिलांचे विचार आणि त्यांच्या मतांचं स्वागत करेल. समानता आणि समता ही या प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्य असतील.'


संबंधित बातम्या :


Jio Institute in Navi Numbai : नीता अंबानींची मोठी घोषणा, नवी मुंबईत जिओ इन्स्टिट्यूट सुरु होणार, रिलायंसकडून 5 मिशन लॉन्च


स्तनाच्या कॅन्सरचे दोन तासात होणार निदान! रिलायन्स फाउंडेशनच्या ‘वन स्टॉप ब्रेस्ट क्लिनिक’चे नीता अंबानींच्या हस्ते उद्घाटन