NIA Raid : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) गजवा-ए-हिंद प्रकरणात आक्रमक झाली आहे. याप्रकरणी एनआयएने आज तीन राज्यात सात ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. गजवा-ए-हिंद संघटना दहशतवादी अल कायदा संघटनेसोबत काम करत असल्याचा आरोप आहे. देशविरोधी कारवाई केल्याच्या माहितीवरुन धाडी मारण्यात आल्या आहेत. हिंसक दहशतवादी कारवाया करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन तरुणांचे ब्रेन वॉश केले जाते. त्यामुळेच एनआयएने आज तीन राज्यात सात ठिकाणी छापेमारी केली असून काही जणांची चौकशी केली. 


राष्ट्रीय तपास यंत्रणाने (NIA)महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रत्येकी तीन तीन ठिकाणी छापेमारी केली तर मध्य प्रदेशमध्ये एका ठिकाणी धाड टाकली.  द हिंदूच्या रिपोर्ट्सनुसार, एनआयएने आज गजवा-ए-हिंद प्रकरणी नागपुरात तीन ठिकाणी छापेमारी केली. आज पहाटे चारच्या सुमारास एनआयचे दिल्लीतून आलेले 20 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक नागपुरातील सतरंजीपुरा परिसरातील बडी मशीद परिसरात दाखल झाले. त्यांनी गुलाम मुस्तफा नावाच्या व्यक्तीचा शोध सुरु केला. एनआयएला माहिती मिळाली होती की, तो याच बडी मशीद परिसरात भाड्याने राहत आहे. या छाप्यादरम्यान नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी-कर्मचारी देखील हजर होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती.






22 जुलै 2022 रोजी गजवा ए हिंद प्रकरणी बिहारमधील फुलवारीशरीफ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा केला होता. फुलवारीशरीफ प्रकरणातील तपासाबद्दल एनआयए म्हणाले होते की,  ‘मरगुब अहमद दानिश हा आरोपी कट्टरपंथी विचारधारा असणारा व्यक्ती आहे. तो गजवा ए हिंद या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यामातून ब्रेन वॉश करतो. त्याशिवाय तो अनेक परदेशी संस्थांच्या संपर्कात होता. गजवा ए हिंद हा व्हॉट्सअॅप ग्रुपही मरगुब अहमद दानिश यानेच तयार केला होता.’ 


आणखी वाचा :
NIA Raid : नागपुरातील सतरंजीपुरामध्ये एनआयए पथक, देशविरोधी कारवाई केल्याच्या माहितीवरुन धाड