NIA to Investigate AIIMS Server Hack Case: दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) देशातलं सर्वात मोठं रुग्णालय आहे. इथं देशातल्या सर्वोच्च नेत्यांपासून सर्वसामान्यांचे उपचार होतात. इथं वर्षाला अडीच लाखांवर ऑपरेशन्स होतात. तर उपचार घेणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. याच एम्सवर सायबर अटॅक झाला आणि देशात खळबळ उडाली. 24 नोव्हेंबरला इथलं सर्व्हर डाऊन झालं. त्यानंतर रुग्णालयाच्या डेटाबेसवर सायबर अटॅक झाल्याची माहिती समोर आली. आणि आता हॅकर्सनी ‘एम्स’कडे तब्बल 200 कोटींपेक्षा जास्त रुपयांची खंडणी मागितलीय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये देण्याची मागणी केलीय, असं असलं तरी दिल्ली पोलिसांनी मात्र ही मागणी असल्याचा दावा फेटाळलाय. आता या प्रकरणाचा तपास एनआयएकडे जाण्याची शक्यता आहे. 


सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार, गृह मंत्रालयाने याप्रकरणी उच्च स्तरिय बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये एम्समधील मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्याशिवाय  एनआयसी, एनआयए, दिल्ली पोलीस आणि एमएचएमधील काही अधिकाऱ्यांचा समावेश होता.  तसेच या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात यावा, असेही या बैठकीत बोलणं झाल्याचं समजतेय. 
 
दरम्यान, हॅकर्सच्या दाव्यानुसार चोरलेल्या डेटाबेसमध्ये मंत्र्यांसह महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती आहे. त्यात माजी पंतप्रधान, मंत्री, न्यायाधीशांसह अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. शिवाय गेल्या सात दिवसापासून डाऊन असलेलं एम्सचं सर्व्हर सातव्या दिवशीही डाऊन होतं. सात दिवसांपूर्वी इथं झालेल्या हॅकिंगमुळे कोट्यवधी रुग्णांचा डेटा चोरीला गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.. शिवाय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, दिल्ली पोलिसांचा सायबर सेल,आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी रॅन्समवेअर अटॅकचा तपास करताय़ेत. सध्या तरी इथलं सगळं कामकाम मॅन्युअल मोडमध्ये सुरु आहे. तर सगळ्या डिजिटल सिस्टिम्स स्कॅनिंग सुरु आहेत. लवकरत सर्व्हर ऑनलाईन येईल असा विश्वासही आहे.. पण, इतक्या मोठा सायबर हल्ल्यामुळे आपल्या सायबर सुरक्षा यंत्रणांवर प्रश्न चिन्ह निर्माण झालेत.


दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या म्हणजे एम्सच्या ऑनलाईन सिस्टिमवर सायबर हल्ला झाल्याचं उघडकीस आलं आहे. एम्सच्या सिस्टिममधून सुमारे चार कोटी रुग्णांच्या डेटाची चोरी झाली आहे. देशाच्या वैद्यकीय क्षेत्रातील हे सर्वात मोठे हॅकिंग आहे. या प्रकरणात गेल्या दोन दिवसांपासून सीबीआय, आयबी, डीआरडीओ आणि दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. तसंच एम्सच्या दोन सिस्टिम अॅनालिस्टसना निलंबित करण्यात आलं आहे. एम्सच्या ऑनलाईन केंद्रीय यंत्रणेशी संबंधित संगणकांची तपास यंत्रणांकडून तपासणी करण्यात येत आहे. सायबरतज्ज्ञ आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर्सकडून डेटा हॅकिंगचे स्रोत आणि रिसिव्हरचा शोध घेण्यात येत आहे. तसंच सायबर हल्ले रोखण्यासाठी उपाययोजनाही करण्यात येत आहे. एम्समधला सायबर हल्ला हा डेटा हॅकिंग आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीशी संबंधित असल्याचा संशय आहे. तसंच हा सायबर दहशतवादाशी संबंधित हल्ला असल्याचं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे