Chandigarh Rich People in India : नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5 (NFHS) अहवालानुसार चंदीगडमध्ये भारतातील सर्वात जास्त श्रीमंत लोक आहेत. चंदीगडमधील 79 टक्के लोकसंख्या सर्वाधिक संपत्तीमध्ये येते. चंदीगडनंतर दिल्ली (68%) आणि पंजाब (61%) यांचा क्रमांक लागतो.


इतर राज्यांमधील आकडेवारी 


भारतात सर्वाधिक श्रीमंत लोक हे शहरी भागात राहतात. केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये 40% पेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक संपत्तीमध्ये आहे. तर, झारखंड (46%), बिहार (43%) आणि आसाम (38%) ही सर्वात कमी संपत्ती असलेल्या लोकसंख्येची सर्वाधिक टक्केवारी असलेली राज्ये आहेत.


धर्मनिहाय आकडेवारीनुसार


धर्मनिहाय डेटा दर्शवितो की, देशात हिंदू आणि मुस्लिमांकडे सर्वात कमी संपत्ती आहे. भारतात 19.1% हिंदू आणि 19.3% मुस्लिम सर्वाधिक संपत्तीच्या श्रेणीत येतात. अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील 71 टक्के लोकसंख्या आणि अनुसूचित जातीच्या कुटुंबातील 49 टक्के लोकसंख्या दोन सर्वात कमी संपत्तीमध्ये आहे. भारतातील धार्मिक समुदायांमध्ये जैन हे सर्वात श्रीमंत आहेत, त्यांच्या लोकसंख्येपैकी 80% पेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक संपत्तीमध्ये येते. शीख समुदाय देखील श्रीमंत आहे. त्यांच्या लोकसंख्येपैकी 59.1% लोकसंख्येच्या सर्वाधिक संपत्तीमध्ये येते.


मोटारसायकल वाहतुकीला प्राधान्य


शहरी भागात वाहतुकीचा प्राधान्यक्रम मोटारसायकल आहे. शहरी लोकसंख्येपैकी 60.6% लोक या मार्गाने प्रवास करतात, त्यानंतर 43% सायकलवरून आणि फक्त 13.8% शहरी भारतातील लोक कारने प्रवास करतात. ग्रामीण भारतात,अगदी कमी स्वत:च्या मोटार सायकल 4.4% आणि 54.2% वर सायकलींना प्राधान्य दिले जाते.


मोबाईलचा सर्वाधिक वापर


मोबाईलचा वापर देशभरात अगदी झपाट्याने वाढत गेला आहे. भारतात 96.7% शहरी रहिवासी आणि 91.5% ग्रामीण रहिवासी मोबाईलचा वापर करतात.  या अनुषंगाने, लँडलाईनचा वापर शहरी भागात फक्त 4.6% आहे आणि ग्रामीण भागात 1.1% इतका कमी आहे. 


पिण्याच्या पाण्याची सुविधा


भारतातील जवळपास 99% शहरी कुटुंबांना तर 95% ग्रामीण कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचे सुधारित स्त्रोत उपलब्ध आहेत.


महत्वाच्या बातम्या :