New Year Eve: 2022 वर्षातील अखेरचा सुर्यास्त जगभरात झालाय. तर काही ठिकाणी नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत होत आहे. गोवा, मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, पंजाबसह देशभरातील सुर्यास्ताची दृष्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. नेटकरी 2022 वर्षातील अखेरच्या सुर्यास्ताचे फोटो पोस्ट करत आहे. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचं सर्वात आधी स्वागत करण्यात आलेय. जोरदार रोषणाई, आतिषबाजी अन् उत्साहात लोकांनी 2023 चं स्वागत केलेय. 


 


ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत, पाहा व्हिडीओ






भारतामध्ये 2022 ला निरोप, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज-














मोठ्या संख्येत पर्यटक गोव्यात दाखल, पर्यटकांसाठी मोठं आकर्षण म्हणजे बोट पार्टी
गोव्यात दोन वर्षांनंतर देशभरात निर्बंधमुक्त नवीन वर्षाच्या स्वगतासाठी पार्टीचं आयोजन केलं जात आहे. मोठ्या संख्येत पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत आणि या पर्यटकांसाठी मोठं आकर्षण म्हणजे बोट पार्टी. बोट पार्टी पैकी सर्वात मोठी पार्टी होत आहे मजेस्टिक प्राईडची.


New Year Mumbai Celebration: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईचे वाहतूक पोलीस सज्ज
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईचे वाहतूक पोलीस सज्ज,मुंबईकरांना थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागत आणि साजरा करण्यासाठी वाहतूक पोलिसांचा नियम पाडण्याचं आवाहन, वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण मुंबईमध्ये आज संध्याकाळपासून 100 ठिकाणी नाकाबंदी लावून वाहतूक नियम न पाळणारांवर कारवाई केली जाणार आहे, मुंबई मध्ये 2200 वाहतूक पोलीस मुंबईचा रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात,,, मुखर्जी चौक ते गेट ऑफ इंडिया च्या दिशेने जाणारा एका साईडचा रस्ता वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे, तर दुसरा मरीन ड्राईव्हचा नेताजी सुभाषचंद्र मार्गवरील नरिमन पॉईंट पासून ते प्रिन्सेस ट्रेड फ्लावर उत्तर दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे,,,, वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण मुंबईचा समुद्रकिनाराचा आजूबाजू चा रस्त्यावर नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. 


विकेंड आणि नववर्षानिमित्त सुट्ट्यांमुळे किल्ले रायगडावर शिवप्रेमींची गर्दी
नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. अलिबाग, मुरुड येथील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठ्या संख्येने भेट दिली आहे.