नवी दिल्ली: संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्धाटनाची दिल्लीत आता जोरदार तयारी सुरू झाल्याचं दिसून येतंय. रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमाच्यावेळी मदुराई अधानमच्या 293 व्या मुख्य पुजाऱ्यांच्या वतीने 'सेंगोल' राजदंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सूपूर्त करण्यात येणार आहे. पण त्याआधी मदुराई अधानमचे मुख्य पुजारी हरिहरा देसिका स्वामीगल यांनी एक वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान मोदींचे जागतिक स्तरावर कौतुक झाले आहे आणि देशातील प्रत्येकाला त्यांचा अभिमान असून 2024 मध्ये नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान व्हावे असे ते म्हणाले.


मुख्य पुजारी हरिहरा देसिका स्वामीगल म्हणाले की, "पंतप्रधान मोदी हे असे नेते आहेत ज्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. ते लोकांसाठी चांगल्या गोष्टी करत आहेत. त्यांना 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान बनायचे आहे आणि लोकांना मार्गदर्शन करायचे आहे. आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. कारण जागतिक नेते आहेत."


इतिहासाची पुनरावृत्ती होईल


रविवारी, 28 मे रोजी जेव्हा पंतप्रधान देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन करतील, तेव्हा इतिहासाची पुनरावृत्ती होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन संसद भवनात सेंगोल स्थापित करतील. पंतप्रधानांकडे हे सेंगोल मदुराई अध्यानमचे मुख्य पुजारी सूपूर्त करतील. 


भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री हे सेंगोल तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड माऊंटबॅटन यांच्याकडून हे सेंगोल स्वीकारलं होतं. 


सेंगोलचे ऐतिहासिक महत्त्व


सेंगोलला ऐतिहासिक असं महत्त्व आहे. चोल वंशाच्या काळात याचा उपयोग सत्ता हस्तांतरणासाठी केला जात असे. ब्रिटिशांनी भारतीयांकडे सत्ता हस्तांतरित केली त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरु यांनी हे सेंगोल स्वीकारल होतं. आता हेच सेंगोल मदुराई अधिनामचे पुजारी पीएम मोदींना सुपूर्द करतील.


सेंगोलचे वर्णन करताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, 'स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही भारतातील बहुतेक लोकांना या घटनेची माहिती नाही जी भारतातील सत्ता हस्तांतरणादरम्यान घडली होती. यावेळी सेंगोल पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सोपवण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या पूर्वसंधेला जवाहरलाल नेहरूंना तमिळनाडूतील तिरुवदुथुराई अधानमच्या (मठ) अध्यानमांकडून (पुजारी) हे सेंगोल मिळाले."


या बातम्या वाचा: