PM Modi Cabinet Expansion : केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व नवे मंत्री आज आपल्या पदभार सांभाळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषदेची बैठक बोलावली आहे. नव्या मंत्रिमंडळासोबत होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान मोदी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेत मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता मंत्रिपरिषदेची बैठक बोलावण्यात आली आहे. ज्यामध्ये कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार आणि राज्यमंत्री सहभागी होती. काउंसिल ऑफ मिनिस्टर्स (मंत्रिपरिषद) च्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं विजन जाहीर करणार आहेत.
मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांनी बुधवारी सायंकाळी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. आता विविध खात्यांची जबाबदारी मंत्र्यांना देण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि फेरबदलात सात राज्यमंत्र्यांचा पदोन्नतीसह मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. एकूण 15 सदस्यांना कॅबिनेट मंत्री आणि 28 जणांना राज्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली. ज्योतिरादित्य शिंदे आणि नारायण राणे यांच्यासह आठ नव्या चेहऱ्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. एकूण 12 केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सदस्यांची संख्या पंतप्रधानांसह 78 इतकी आहे.
पंतप्रधान म्हणून मे 2019 मध्ये 57 मंत्र्यांसह आपला दुसरा कार्यकाळ सुरु केल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपरिषदेत फेरबदल आणि विस्तार केला आहे. या फेरबदल आणि विस्तारापूर्वी अनेक बैठका घेण्यात आल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला होता.
मोदी सरकारमधील मंत्र्यांची खातेनिहाय यादी खालीलप्रमाणे :
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विज्ञान, तंत्रज्ञान विभाग देण्यात आले आहे. अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर मनसुख मांडवीय हे नवे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत.
- राजनाथ सिंह - संरक्षण मंत्रालय
- अमित शाह- सहकार, गृह मंत्रालय
- नितीन गडकरी- रस्ते वाहतूक व महामार्ग
- निर्मला सीतारमण - केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट व्यवहार
- नरेंद्र सिंह तोमर - कृषी व शेतकरी कल्याण
- मनसुख मांडवीया - केंद्रीय आरोग्य मंत्रिपद, रसायन आणि खते विभाग
- स्मृती इराणी - महिला, बालविकास मंत्रिपद
- धर्मेंद्र प्रधान -केंद्रीय शिक्षणमंत्री
- पीयूष गोयल - केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रिपद
- अश्विनी वैष्णव - केंद्रीय रेल्वेमंत्री
- हरदीपसिंह पुरी - पेट्रोलियम मंत्रिपद
- ज्योतिरादित्य शिंदे - नागरी उड्डाण मंत्रालय
- नारायण राणे - मध्यम व लधु उद्योग मंत्रालय
- पुरुषोत्तम रुपाला - दुग्धविकास, मत्स्योत्पादन खातं
- अनुराग ठाकूर - केंद्रीय क्रीडामंत्री
- पशुपती पारस -अन्न प्रक्रिया मंत्रालय
- गिरीराज सिंह - केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय
- भुपेंद्र यादव - केंद्रीय कामगार मंत्रालय
- आर के सिंह - केंद्रीय ऊर्जामंत्री
- किरण रिजिजू - केंद्रीय कायदेमंत्री
महत्त्वाच्या इतर बातम्या :