नवी दिल्ली : मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांनी बुधवारी सायंकाळी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. आता विविध खात्यांची जबाबदारी मंत्र्यांना देण्यात आली.  महत्त्वाची खाती कोणाकडे जाणार याबद्दल उत्सुकता होती.  या साऱ्या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणे मोदी यांनी काही खात्यांमध्ये बदल केले आहेत .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. 

मोदी सरकारमधील मंत्र्यांची खातेनिहाय यादी खालीलप्रमाणे

 पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विज्ञान, तंत्रज्ञान विभाग देण्यात आले आहे. अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर मनसुख मांडवीय हे नवे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत.

  • राजनाथ सिंह - संरक्षण मंत्रालय
  • अमित शाह-  सहकार, गृह मंत्रालय
  • नितीन गडकरी- रस्ते वाहतूक व महामार्ग
  • निर्मला सीतारमण - केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट व्यवहार
  • नरेंद्र सिंह तोमर - कृषी व शेतकरी कल्याण
  • मनसुख मांडवीया -  केंद्रीय आरोग्य मंत्रिपद, रसायन आणि खते विभाग
  • स्मृती इराणी - महिला, बालविकास मंत्रिपद
  • धर्मेंद्र प्रधान -केंद्रीय शिक्षणमंत्री
  • पीयूष गोयल - केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रिपद 
  • अश्विनी वैष्णव - केंद्रीय रेल्वेमंत्री
  • हरदीपसिंह पुरी - पेट्रोलियम मंत्रिपद
  • ज्योतिरादित्य शिंदे - नागरी उड्डाण मंत्रालय
  • पुरुषोत्तम रुपाला -  दुग्धविकास, मत्स्योत्पादन खातं
  • अनुराग ठाकूर - केंद्रीय क्रीडामंत्री
  • पशुपती पारस  -अन्न प्रक्रिया मंत्रालय
  • गिरीराज सिंह - केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय
  • भुपेंद्र यादव  - केंद्रीय कामगार मंत्रालय
  • आर के सिंह - केंद्रीय ऊर्जामंत्री
  • किरण रिजिजू - केंद्रीय कायदेमंत्री

मोदी सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्रिमंडळ आहे. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले आहे, यामुळे मंत्रिमंडळाचे सरासरी वय खूपच कमी होईल. तसेच मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाल्यापासूनच अनेक मंत्र्यांची जबाबदारी काढून घेतली जाऊ शकते अशा शक्यताही वर्तवण्यात येत होत्या. अशातच मोदी मंत्रिमंडळातील अनेक मोठ्या नेत्यांच्या राजीनामे घेण्यात आले. 

संबंधित बातम्या :

PM Modi Cabinet, EXCLUSIVE: मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्व प्रवर्गांच्या नेत्यांना संधी, असं असेल मंत्रिमंडळ!

PM Modi Cabinet : नारायण राणेंना लघु व मध्यम उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी