नवी दिल्ली : नेस्ले कंपनीच्या मॅगीचा 550 टनांचा स्टॉक नष्ट करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे. नेस्ले कंपनीकडून काही दिवसांपूर्वी यासंबंधी मागणी करण्यात आली होती.

मॅगीमध्ये मागच्या वर्षी शीसं जास्त प्रमाणात आढळल्यानं नेस्लेच्या या उत्पादनावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर मॅगीचा स्टॉक तसाच पडून होता. त्याची एक्स्पायरी डेट संपल्याने नेस्लेने या स्टॉक नष्ट करण्याची परवानगी मागितली होती.

मॅगीचा एकस्पायरी डेट संपलेला स्टॉक नष्ट करण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्याने नेस्लेच्या गोदामात पडलेला साठ्याची विल्हेवाट लावता येणार आहे. तसंच अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केलेला मॅगीचा साठाही नष्ट केला जाणार आहे.