असं असलं तरी महाराष्ट्रामध्ये खाजगी महाविद्यालयाच्या जागा सरकारकडे नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व खाजगी महाविद्यालयांना 'नीट' लागूच राहणार , असं राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे अभिमत (डीम्ड) विद्यापीठांचे प्रवेश हे नीट परीक्षेद्वारेच होणार आहेत.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज 'नीट' परीक्षेबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. त्यानंतर नड्डा यांनी सविस्त माहिती दिली.
अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
'नीट' परीक्षेतून सुटका मिळावी ही राज्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. मात्र विद्यार्थ्यांचं भवितव्य आणि विविध राज्य सरकारांची मागणी लक्षात घेऊन, केंद्र सरकारने याबाबत अध्यादेश काढला. या अध्यादेशानुसार यंदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची 'नीट'मधून सुटका होईल.
नीटचा घोळ
मेडिकल प्रवेशासाठी ‘नीट’ ही एकच परीक्षा देशभर घेतली जावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. राज्यातील सीईटी रद्द करुन नीट परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढावली होती.
सविस्तर वृत्त : ‘नीट’ परीक्षेचा नेमका घोळ काय आहे?
याबाबत पुनर्विचार याचिका दाखल करुनही सर्वोच्च न्यायालय आपल्या निर्णयावर ठाम होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धाव घेतली. नीट आणि राज्यांतील सीईटी परीक्षेच्या अभ्यासक्रमात मोठा फरक आहे. त्यामुळे नीटनुसार परीक्षा घेण्यात आम्हाला दोन वर्षांची मुदत मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केली होती.
तावडेंनी माझ्या मुलाची फसवणूक केली, पालक पोलिसात
अध्यादेशाला मान्यता
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने नीट’ परीक्षेबाबतच्या अध्यादेशाला मान्यता दिली होती. या अध्यादेशामुळे मेडिकल प्रवेशासाठी इच्छुक लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. हा अध्यादेश मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे गेला. त्यावर आज शिक्कामोर्तब झाल्याने राज्यातील 2810 जागा या सीईटी परीक्षेतून भरल्या जातील.
शिक्षणमंत्री तावडेंचे प्रयत्न
केंद्रीय अभ्यासक्रमाच्या अकरावी आणि बारावी अभ्यासक्रमाच्या धर्तीवर नीटची परिक्षा घेण्यात येते. सीबीएसई आणि राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात जास्त फरक नाही. परंतु सीबीएसईची परिक्षा पध्दती आणि राज्य शिक्षण मंडळाची परिक्षा पध्दत यामध्ये फरक आहे. त्यामुळे सीबीएसईच्या धर्तीवर होणारी नीट परिक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना अवघड वाटते. त्यामुळे पुढील वर्षी होणारी नीट परिक्षा विद्यार्थ्यांना अवघड जाऊ नये यासाठी आपण उच्च माध्यमिक (एचएससी) बोर्डाच्या अध्यक्षांना दोघांचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पध्दतीत काय बदल करता येऊ शकेल याबाबत शिक्षणतज्ज्ञांची बैठक घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार बदल करण्यात येतील जेणेकरुन विद्यार्थ्यांना पुढील वर्षी होणा-या नीट परिक्षेचा अभ्यास वेळेमध्ये करता येईल असं तावडे यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं.
संबंधित बातम्या
अखेर राष्ट्रपतींची 'नीट' अध्यादेशावर स्वाक्षरी
‘नीट’मधून सुटका, राज्यात यंदा CET प्रमाणेच प्रवेश!
‘नीट’प्रश्नी मुख्यमंत्री आज पंतप्रधानांची भेट घेणार
‘नीट’ प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
‘नीट’ प्रश्नी सुप्रीम कोर्टाचा विद्यार्थ्यांना दिलासा नाही
‘नीट’विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार
त्यापेक्षा अभ्यास करा, ‘नीट’बाबत विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली
‘नीट’ची परीक्षा 1 मे रोजीच होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश