Earth Sets New Record for Shortest Day : शास्त्रज्ञांनी अणु घड्याळांच्या साहाय्याने पृथ्वीच्या फिरण्याचा वेग मोजण्यास सुरुवात केल्यापासून 29 जुलै 2022 या दिवसाची सर्वात लहान दिवस म्हणून नोंद झाली आहे. 29 जुलै रोजी पृथ्वीने 1.59 मिलिसेकंद आधीच आपली एक प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. या पूर्वी 19 जुलै 2020 हा दिवस सर्वात लहान दिवस मोजला गेला होता. या दिवशी पृथ्वीने एक प्रदक्षिणा 1.4602 सेकंद आधीच पूर्ण केली होती.


1973 मध्ये पृथ्वीच्या फिरण्याच्या गती मोजण्यास सुरू झाल्यापासून काही वर्षांपूर्वीपर्यंत असे मानले जात होते की पृथ्वी हळूहळू फिरत आहे. पण इंटरनॅशनल अर्थ रोटेशन अँड रेफरन्स सिस्टीम सर्व्हिस (IERS) नुसार पृथ्वीच्या फिरण्याचा वेग सामान्यपेक्षा किंचित जास्त नोंदवला गेला आहे.


शास्त्रज्ञांच्या मते चंद्र हळूहळू पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग बदलत आहे. त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीचा सूर्याभोवतीचा परिभ्रमण मार्ग किंचित लंबवर्तुळाकार बनत आहे.  


शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार , 1960 पासून 2020 मध्ये 28 दिवस सर्वात लहान  होते. 29 जुलै 2022 रोजी पृथ्वीने आतापर्यंतची सर्वात जलद भ्रमंती केली. त्यामुळे  29 जुलै 2022 हा दिवस सर्वात लहान दिवस म्हणून नोंदवण्यात आला. त्याआधी 26 जुलै 2022 आणि 19 जुलै 2022 या दिवसाची सर्वात लहान दिवस म्हणून नोंद करण्यात आली होती. परंतु आता 29 जुलै हा सर्वात लहान दिवस आहे.  


पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. परंतु, नुकताच वैज्ञानिकांनी केलेल्या खुलाशानुसार पृथ्वी कमी वेळात फेरी पूर्ण करू लागल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या पृथ्वी खूप वेगाने फिरत असून एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तिला 24 तासांपेक्षा देखील कमी वेळ लागत आहे.  शास्त्रज्ञांच्या मते हिमनद्या वितळत असल्यामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग वाढला आहे.  याबरोबरच भूकंप देखील एक कारण असू शकते.  


 पुढे काय होईल?
पृथ्वीचा फिरण्याचा वेग वाढल्यामुळे दिवसाची लांबी कमी होत राहील असे शास्त्रज्ञांचे मत आहे.