केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफच्या 212 बटालियनवर नक्षलवाद्यांनी पूर्वनियोजित कट रचून हल्ला केला.
सीआरपीएफचे जवान किसतराम जंगलात गस्त आणि शोधमोहिम राबवत होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी सुरुंग पेरुन ठेवले होते. नक्षल्यांनी त्या सुरुंगाचा शक्तीशाली स्फोट घडवून आणला. त्यानंतर जवानांवर गोळीबार केला.
या जंगलात जवळपास दीडशे नक्षलवादी दबा धरुन बसले होते. त्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला.
त्याला जवानांनीही प्रत्युत्तर दिलं. मात्र नक्षल्यांनी त्यावेळी शक्तीशाली स्फोट घडवले.
नक्षलवाद्यांनी आधी भूसुरंग पेरले होते. त्यानंतर गोळीबार केला. जवानांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. नक्षलवादी आणि जवानांमध्ये दोन तास चकमक सुरु होती.
दरम्यान, या हल्ल्यानंतर सीआरपीएफचं अतिरिक्त पथक घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.
छत्तीसगडमधील हा आठवडाभरातील दुसरा नक्षलवादी हल्ला आहे. यापूर्वी 7 मार्चला नक्षलवाद्यांनी कांकेर जिल्ह्यात आयईईडी स्फोट घडवला होता. त्यामध्ये दोन जवान शहीद झाले होते.