पणजी (गोवा) : खाणींच्या प्रश्नावरुन गोव्यात शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी परदेशात आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत इतर मंत्र्यांना खाणींचा प्रश्न सोडवता येत नसल्याचा आरोप करत, गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.


खाणींचा प्रश्न मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गैरहाजरीत भाजप आघडी सरकारला सोडवता येत नसल्याने गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करून खाण अवलंबीतांना केंद्र सरकार मार्फत मदत देऊन दिलासा द्यावा,अशी मागणी गोवा शिवसेनेच्या उपराज्यप्रमुख तथा प्रवक्त्या राखी प्रभूदेसाई नाईक यांनी केली आहे.


16 मार्च पासून खाणी बंद झाल्या तर खाण अवलंबित आर्थिक संकटात सापडणार आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी अमेरिकेत गेले असल्याने राज्यात घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला आहे. भाजप आघाडी सरकारला हा प्रश्न सोडवता येत नसल्याने गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.