Gas Price Hike : आधीच महागाईने बेजार झालेल्या सामान्य नागरिकांना आणखी एक झटका बसणार आहे.  केंद्र सरकारनं नैसर्गिक गॅसची (Prices of natural gas) किंमत तब्बल 40 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक गॅसची किमत 6.1 डॉलर प्रति एमएमबीटीयू वरुन 8.57 डॉलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली आहे. नवीन दर एक ऑक्टोबर म्हणजे उद्यापासून लागू होणार आहे


नैसर्गिक गॅसची किमत 6.1 डॉलर प्रति एमएमबीटीयू वरुन 8.57 डॉलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली आहे.   एप्रिल 2022 मध्ये नैसर्गिक गॅसची किंमत वाढून 6.10 डॉलर प्रति एमएमबीटीयू  करण्यात आली होती. आता एक ऑक्टोबर 2022 पासून यामध्ये वाढ करण्यात आली असून 8.57 डॉलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली आहे. म्हणजेच यामध्ये 40 टक्के वाढ करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली होती.


घरगुती गॅसच्या दराबरोबर आता वाहतुकीच्या खर्चात देखील वाढ होणार आहे. रशिया - युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात  नैसर्गिक गॅसच्या किंमतीत वाढ पाहायला मिळत आहे.  सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आरबीआयनं रेपो रेटच्या दरात वाढ करत सर्वसामान्यांना झटका दिला आता नैसर्गिक गॅसच्या किंमतीमध्ये वाढ करत डबल झटका दिला आहे. 


नैसर्गिक वायूच्या किंमतीत 1 डॉलरने वाढ झाल्यानंतर सीएनजीचे सीएनजीच्या दरात साडे चार रुपये प्रतिकिलो इतकी वाढ होते. सीएनजीच्या दरात 12 ते 13 रुपये किलो वाढ होण्याची शक्यता आहे. तर पीएनजीच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. 


आरबीआयकडून रेपो दरात 50 BPS ने वाढ


आरबीआयचे पतधोरण जाहीर केले. आरबीआयने रेपो दरात 50 बीपीएस पॉईंट म्हणजे 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे आता सामान्यांना सणासुदीच्या काळात ईएमआय वाढीला सामोरे जावे लागणार आहे. त्याशिवाय, नवीन कर्जेदेखील महाग झाली आहेत. आरबीआयच्या व्याज दरवाढीनंतर आता व्याज दर 5.90 टक्के इतका झाला आहे. वर्ष 2023 मध्ये विकास दर हा 7 टक्के राहण्याचा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. मागील पाच महिन्यात व्याज दरात 1.90 टक्क्यांची वाढ झाली आहे. याआधी व्याज दर 5.40 टक्के इतका होता. आता, व्याज दर 5.90 टक्के इतका झाला आहे. 


संबंधित बातम्या :