EMI Calculator : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ (RBI Hike Repo Rate) केली आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आरबीआयचे पतधोरण जाहीर केले. आरबीआयने रेपो दरात 50 बीपीएस पॉईंट म्हणजे 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे आता सामान्यांना ईएमआय वाढीला सामोरे जावे लागणार आहे. कोरोना काळात गृहकर्ज स्वस्त झाल्यामुळे अनेकांनी घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्जावर घर खरेदी केले. परंतु, आता आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यामुळे त्यांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. आधीच वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या सामान्य लोकांवर ईएमआयचा बोजा वाढणार आहे.  (Utility News In Marathi)


स्वस्त गृहकर्जाच्या चक्रात अडकले ग्राहक 
कोरोना काळात गृहकर्ज स्वस्त झाल्यामुळे देशभरात लाखो लोकांनी नव्या घराची खरेदी केली. परंतु,  आता रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक लोक या ईएमआय वाढीच्या चक्रात फसले आहेत. याबाबत उदाहरण द्यायचे झाले तर, कोरोना काळात म्हणजेच 2020 मध्ये ज्या ग्राहकाने 25 लाख रूपयांची होम लोन घेतले आहे त्यासाठी त्याने 20 वर्षांची कर्ज फेडीची मुदत घेतली. त्यासाठी बंकेकडून या ग्राहकाला 6.70 टक्के व्याज आकारण्यात आले. संबंधित ग्राहकाला 22, 053 रूपयांचा महिन्याला हप्ता भरावा लागत होता. 15 वर्षात त्याला 25 लाख रूपयांची मुळ रक्कम भरावी लागणार होती. या मुळ रकमेवर 14,69,629 रूपयांचे व्याज द्यावे लागणार होते. म्हणजेच 180 महिन्यात संबंधित ग्राहकाला बँकेचे  39,69,629 रूपये द्यावे लागणार होते.  परंतु, आता यात वाढ होणार आहे.  


ईएमआय तोच राहणार पण...


रेपो रेट वाढल्यानंतर आता गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांचा ईएमआय तोच आहे. परंतु, त्याचा कालवधी वाढला आहे. त्यामुळे अशा ग्राहांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना 22053 रूपयांचाच महिन्याचा हप्ता असेल. परंतु, त्यांचे गृहकर्ज 15  वर्षे म्हणजे 181 ईएमआय भरून संपणार होते त्यात वाढ होऊन 18 वर्षे म्हणजे 216 महिने झाले आहे. रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर आता संबंधित ग्राहकांना 234 ईएमआय भरावे लागणार आहेत. 25 लाख रूपयांच्या गृहकर्जावर  14,69,629 रूपयांचे व्याज द्यावे लागणार होते तेथे आता 26,79,772 रूपये व्याज द्यावे लागणार आहे. पूर्वी 18 महिन्यांमध्ये 39,69,629 रूपयांची फेड करावी लागणार होती तेथे आता 234 महिन्यात 51,79,772 रूपये भरावे लागणार आहेत. याचा अर्थ रेपो दरात वाढ झाल्यानंतर 12.10 लाख रूपये जास्तीचे व्याज भरावे लागणार आहे. या सर्वाचा अर्थ गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांनाच्या ईएमआयच्या रकमेत वाढ झाली नाही परंतु, पहिल्यापेक्षा तीन वर्षे जास्त ईएमआय भरावे लागणार आहेत. 


पाच वेळा रेपो दरात वाढ
2022-23 च्या मागील पाच महिन्यात सलग चार वेळा आरबीआयने रेपो दरात वाढ करून कर्ज महाग केले आहे. वाढती महागाई कमी करण्यासाठी रेपो दरात वाढ केल्याचे कारण रिझर्व्ह बँकेकडून देण्यात येत आहे. परंतु, याचा परिणाम कर्जदारांवर होत आहे. रेपो दरात वाढ केल्यानंतर सरकारी कंपन्यांसह फायनान्स कंपन्या देखील आपल्या व्याज दरात वाढ करतात. त्यामुळेच गृहकर्जात वाढ होत आहे. 


 आरबीआयच्या निर्णयामुळे वाढल्या अडचणी
गेल्या दोन वर्षांमध्ये ज्या लोकांनी घर खरेदी केले आहे त्यांना आता आरबीआयाने रेपो रेटमध्ये वाढ केल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण दोन वर्षापूर्वी घर घेताना बॅंकांनी 6.70 टक्क्यांपासून 7.25 टक्के व्याजाने कर्ज दिले होते. परंतु, आता रेपो दरात वाढ झाल्यामुळे हेच व्याच 8.10 ते 8.65 टक्के झाले आहे.


महत्वाच्या बातम्या


RBI Hike Repo Rate: तुमचा EMI महागला; आरबीआयकडून रेपो दरात 50 BPS ने वाढ


RBI Meeting : GDP घटणार, महागाईची झळ किती दिवस? RBI गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे