मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


मुंबईसह देशभरात आजपासून बूस्टर डोसला  सुरुवात


 देशासह मुंबईतील खासगी रुग्णालयात 18 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. 9 महिने दोन्ही डोस झालेल्यांनाच बूस्टर डोस देण्यात येईल. आजपासून कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत ते नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन कोरोना लसीचा बूस्टर लस घेऊ शकतील.  या पार्श्वभूमीवर कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सनीचे दर कमी करण्यात आले आहे. 


 देशातील XE व्हेरियंटचा पहिला रुग्ण मुंबईत


मुंबईतून बडोद्याला प्रवास करणाऱ्या एका 67 वर्षीय पुरुषांमध्ये एक्स ई व्हेरियंट (XE) आढळला आहे.  आज एन.सी.डी.सी. नवी दिल्ली यांनी स्पष्ट केले आहे. या रुग्णाला बडोद्यामध्ये 12 मार्च रोजी सौम्य ताप आल्याने त्याची कोविड तपासणी करण्यात आली. त्याच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.


देशभरात रामनवमीचा उत्साह



  • कोरोनानंतर तब्बल दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात येणार आहे. अयोध्येतील राम जनमोत्सवाच्या कार्यक्रमाचे पहिल्यांदाच दूरदर्शन, आकाशवाणीवर लाईव्ह प्रसारण करण्यात येणार आहे.

  •  विश्व हिंदू परिषदेने पश्चिम बंगालमध्ये एक हजार रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. 

  • रामनवमी निमित्त राज्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन

  •  पंतप्रधान नरेंद्र मोदी रामनवमीनिमित्त गुजरातमधील जुनागढच्या गठिल येथील उमिया माता मंदिर 14 व्या स्थापना समारोपाच्या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे  संबोधित करणार आहे.


आयपीएलचे दोन सामने आज मुंबईत



  • आयपीएलचे दोन सामने उद्या मुंबईत होणार आहे. पहिला सामना कोलकाता नाईड रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये दुपारी 3.39 वाजता ब्रेबोर्नच्या सीसीआई स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहे

  • दुसरा सामन राजस्थान  रॉयल्स विरुद्ध  लखनौ सुपर जाईंट्स यांच्यात खेळवण्यात येणर आहे. संध्याकाळी 7.30 वाजता वानखेडे स्टेडियम येथे होणार आहे.


बंगळूरूमध्ये रामनवमीनिमित्त मांस विक्री करण्यास बंदी


बंगळूरूमध्ये श्रीरामनवमीनिमित्त मांस विक्री करण्यास बंदी घातली आहे.  या आदेशाचे परिपत्रक काढून आदेश जारी केले आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दरवर्षी श्रीरामनवमी, गांधी जयंती आणि इतर धार्मिक सणांच्या दिवशी मांस विक्रीस बंदी असते.


नोएडातील ट्विन टॉवर पाडण्यासाठी टेस्ट ब्लास्ट


नोएडातील सुपरटेक एमराल्ड कोर्ट सोसायटीमध्ये बांधलेले बेकायदेशीर ट्विन टॉवर पाडण्यासाठी एक टेस्ट ब्लास्ट करण्यात येणार आहे. टेस्ट ब्लास्ट दुपारी 2.30 च्या सुमारास घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर टॉवर समोरील दोन रस्ते बंद करण्यात येणार आहे. 


जपान सरकारकडून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा मान्यताप्राप्त लसींच्या यादीत समावेश


जपान सरकारकडून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा मान्यताप्राप्त लसींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.  कोव्हॅक्सीन लस घेतलेल्यांना जपानमध्ये प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.