Today Weather: सध्या देशभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. देशाच्या राजधानीतसुद्धा हुडहुडी वाढली आहे. शनिवारी दिल्लीतील तापमान हे 6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. तर आज सकाळी हवामान विभागाच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत 4.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर कमाल तापमान हे  18 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय राजधानीत निरभ्र आकाश आणि थंड वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर राजस्थानमधील चुरुमध्ये उणे 1.1 तापमानाची नोंद झाली आहे. त्याठिकाणी बर्फ पडत असल्याचे चित्र दिसत आहे.







हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये शनिवार हा हंगामातील पहिला 'थंड दिवस' ​​होता. वायव्य वाऱ्यांमुळे शहरात किमान तापमान 6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. कमाल तापमान 17.8 अंश सेल्सिअस नोंदवले होते.  जे सामान्यपेक्षा पाच अंशांनी कमी आणि हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. जेव्हा किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते आणि कमाल तापमान सामान्यपेक्षा किमान 4.5 अंश सेल्सिअसने कमी नोंदवले जाते तेव्हा तो थंड दिवस ​​असल्याचे म्हटले जाते.


दिल्लीत हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) हा सकाळी 9 वाजता 274 वर होता, जो खराब श्रेणीत येतो. फरीदाबादमध्ये 234, गाझियाबादमध्ये 224, ग्रेटर नोएडामध्ये 177, गुरुग्राममध्ये 214 आणि नोएडामध्ये 204 हवा गुणवत्ता निर्देशांक होता. शून्य ते 50 मधील AQI 'चांगले' म्हणून, 51 आणि 100 'समाधानकारक', 101 आणि 200 'मध्यम', 201 आणि 300 'खराब', 301 आणि 400 'अत्यंत खराब' आणि 401 आणि 500 ​​दरम्यान 'एव्हर' मानला जातो.







दरम्यान, सफदरजंगमध्ये सकाळी दाट धुक्यामुळे दृश्यमानता 1800 मीटरवर नोंदवण्यात आली आहे. याशिवाय डोंगरावरील बर्फवृष्टीचा परिणाम अनेक राज्यांवर होत आहे. उत्तर प्रदेशातही कडाक्याची थंडी आहे. त्याचबरोबर पंजाब, हरियाणा, बिहारमध्येही थंडी वाढली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत थंडीची लाट पाहता यलो अलर्ट 3 दिवस कायम राहणार आहे.


महाराष्ट्रात परभणी, हिंगोली, वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. हिंगोली जिल्ह्यातील तापमानात प्रचंड घट झाली आहे. परिणामी जिल्हाभरात थंडीची लाट पसरली आहे दिवसभर वातावरण थंड असून थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक ऊबदार कपडे वापरत आहेत. परभणी जिल्ह्यातील तापमान 10 अंशापर्यंत खाली आहे. त्यामुळे नागरिक ठिकठिकाणी शेकोटी पेटवून उब घेताना दिसत आहेत. वाशिममध्येही गेल्या काही आठवड्यापासून गायब झालेल्या थंडीने परत जोर धरला आहे. वाशिम जिल्ह्यात 14℃ पर्यंत पारा खाली घसरला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: