NIA Raids:  टेरर फडिंगविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आता कामाला लागली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई करण्यात आली आहे. श्रीनगर, अनंतनाग, कुपवाडा, शोपिया, राजौरी आणि पुंछमध्ये एनआयएचे पथक छापेमारी करण्यासाठी पोहचले. सध्या तरी कोणाला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली नाही आहे. तसेच तमिळनाडूमध्ये (Tamilnadu) देखील राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई करण्यात येत आहे, 


याआधी 2 मे रोजी जम्मू-काश्मीरमधल्या सहा जिल्ह्यांमध्ये एनआयएकडून कारवाई करण्यात आली होती. या सहा जिल्ह्यांमधील 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्यामध्ये पीर पंजालचे क्षेत्र, मध्ये आणि दक्षिण काश्मीरमधल्या काही भागांचा समावेश होता. असे म्हटले जात होते की ही कारवाई दहशतवादाच्या विध्वसंक कारवाईंना हाणून पाडण्यासाठी तसेच दहशतवाद्यांच्या कटाला मोडून काढण्यासाठी ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली होती. 


तमिळनाडूमध्ये देखील छापेमारी 


याशिवाय तमिळनाडूमध्ये देखील राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी करण्यात येत आहे. तमिळनाडूमधील दहापेक्षा अधिक ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई सध्या सुरु आहे. माहितीनुसार, एनआयएचे पथक पीएफआयशी संबंधित काही लोकांच्या जागेवर छापेमारी करत आहे, तसेच ही छापेमारी याआधी करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर केली जात आहे. याआधी पीएफआयवर करण्यात आलेल्या छापेमारीमध्ये संपूर्ण देशातून 106 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. 


पीएफआयवर अनेक गंभीर आरोप


पीएफआयवर (PFI) अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच पीएफआय दहशतवादी संघटनांना मदत करत असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे  पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर तपास यंत्रणांनी देशभरात छापेमारी केली होती.  25 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश या राज्यांसह इतर राज्यांमधील 17 ठिकाणी एनायएने छापेमारी केली होती.  दोन टप्प्यात केलेल्या या कारवाईत पीएफआयच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्याशिवाय, त्यांच्या कार्यलयातून महत्त्वाचे दस्ताऐवजही जप्त करण्यात आले होते. या कारवाईनंतर केंद्र सरकारने पीएफआयवर पाच वर्षांसाठी बंदी घातली. एनआयएने केलेल्या कारवाईत महाराष्ट्र एटीएसचा सहभाग होता. एटीएसच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 


 






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Manipur Violence : मणिपूर हिंसाचारात अडकलेल्या 25 विद्यार्थ्यांचं सुखरूप मुंबईत आगमन, विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र सरकारचे आभार